सामाजिक

प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाला संपविले 

Spread the love

छत्रपती संभाजीनगर  / नवप्रहार डेस्क 

                   अमित मुरलीधर साळुंके (२५) या तरुणावर दि.१४ जुलै रोजी सासरा आणि पुतण्याने मिळून चाकूने वार करत गंभीर जखमी केले होते. त्याला गंभीर जखमी अवस्थेत घाटी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमित वर हा हमला त्याने ज्या मुलीशी आंतरधर्मीय विवाह केल्याने मुलीचे वडील आणि चुलत भावाने हमला केला होता.

पोट व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे लहानपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, भिन्न धर्मामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्याने २ मे रोजी ते घरी परतले. त्यानंतर त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र, विद्याच्या कुटुंबाच्या मनातला राग गेला नव्हता. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलै रोजी अमित परिसरात फिरत असताना गीताराम व आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केले. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी अमितची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

संतप्त पत्नीचा पोलिस ठाण्यात ठिय्या
अमितवरील हल्ल्याला ११ दिवस उलटूनही मारेकरी वडील व भावाला जवाहरनगर पोलिसांनी अटक न केल्याने अमितच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत त्याच्या कुटुंबीयांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होते. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शिवाय, सासरा गीताराम व आप्पासाहेबव्यतिरीक्त पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3