राजकिय

शिवसेना शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत मोठा ट्विस्ट ; भाजपा च्या बड्या नेत्याचे नाव गायब 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क 

                  काल दि.28 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या यादीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.  तिसऱ्या यादीत शिवसेनेने 15 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या भाजप हायप्रोफाईल उमेदवार अशी चर्चा असलेल्या शायना एनसी यांना शिवसनेने उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत सुजय विखे यांचा पत्ता कट

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत कन्नड मधून रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संगमनेर मधून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली. याचा अर्थ संगमनेर मधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपली आहे. हातकणंगले आणि शिरोळ हे दोन मतदार संघ मित्र पक्षांना सोडण्यात आले आहेत. या मतदार यादीत धारावीच्या उमेदवाराचा उल्लेख नाही. धारावी मधून समीर वानखेडे एकदा शिंदे यांचे उमेदवार होतील अशी शक्यता होती. मात्र, धारावी हा मतदारसंघ रामदास आठवले यांच्या आरपीआय या पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे समीर वानखेडे आरपीआयमध्ये प्रवेश करून त्या मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी शक्यता आहे. मीरा-भाईंदर मधून शिंदे समर्थक अपक्ष आमदार घेता जैन यांच्या नावाचा उल्लेख नाही.शायना एनसी यांना मुंबादेवी मधून उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार आणि माजी नगरसेवक अतुल शहा आणि माजी आमदार राज के पुरोहित हे दोघेही इच्छुक होते.

वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे वरळीतून मैदानात उतरले आहेत. तर, भाजप नेत्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, शायना एन सी ऐवजी शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे

  1. मुंबादेवी श्रीमती शायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन सी)
  2. संगमनेर अमोल धोंडीबा खताळ
  3. श्रीरामपूर भाऊसाहेब मल्हारी कांबळे
  4. नेवासा विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील
  5. धाराशिव अजित बाप्पास्सहेब पिंगळे
  6. करमाळा दिग्विजय बागल
  7. बार्शी राजेंद्र विठ्ठल राउत
  8. गुहागर राजेश रामचंद्र बंडल
  9. सिवखेडराजा शशिकांत नरसिंगराव खेडेकर
  10. घनसवांगी हिकमत बळीराम उढाण
  11. कन्नड श्रीमती संजना जाधव
  12. कल्याण ग्रामीण राजेश गोवर्धन मोरे
  13. भांडुप पश्चिम अशोक धर्मराज पाटील
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close