सामाजिक

शिवसेना महानगर तर्फे साजरी होणार शिवजयंती

Spread the love
भव्य शोभायात्रा निघणार ,  आकर्षक झाकल्या आणि बँड व लेझीम पथकाचा असणार समावेश
अमरावती / प्रतिनिधी
 शिवसेना अमरावती महानगर तर्फे साल दर साल छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार भव्य दिव्यतेने साजरी केल्या जाते. यावर्षी सुद्धा दिनांक 28 मार्च 2024 गुरुवार रोजी शोभायात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत 14 विविध प्रकारच्या आकर्षक झाक्या, विविध प्रकारचे बडनेरा येथील ढोल पथक, बाभूळगाव येथील सुप्रसिद्ध संदल, जालना येथील सुप्रसिद्ध संदल, उज्जैन येथील झांज पथक, डीजे, दिंड्या व घोडे शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण राहनार असून,फटाक्यांच्या आतिशबाजीत शिस्तीत ही शोभयात्रा निघणार आहे.या शोभायात्रेत अध्यक्ष म्हणून माजी आमदार कॅप्टन तथा शिवसेना सचिव व संपर्क प्रमुख मा.श्री अभिजित अडसूळ, उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार श्री श्रीकांतजी देशपांडे व मूर्तिजापूर चे माजी नगरअध्यक्ष श्री नानकरामजी नेभनानी असणार आहेत.प्रमुख उपस्थितीत माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री आनंदरावजी अडसूळ, खासदार श्री अनिलजी बोंडे, मा. आमदार श्री प्रवीणजी पोटे, मा. आमदार श्री प्रतापदादा अडसड, मा.आमदार सौ सुलभाताई खोडके व विशेष उपस्थितीत पोलीस आयुक्त श्री नविनचंद्रजी रेड्डी, महानगरपालिका आयुक्त श्री देविदासजी पवार,  पालकमंत्री श्री जगदीशजी गुप्ता, ऍंड मा.श्री प्रशांतजी देशपांडे, मा.प्रा श्री संजयजी तीरथकर ही सर्व मान्यवर मंडळी शोभायात्रेची शोभा वाढविणेकारिता उपस्थित असतील.
आझाद हिंद मंडळ बुधवारा येथून शोभायात्रेला प्रारंभ होऊन सीताराम बिल्डिंग चौक -अंबागेट -गांधी चौक -राजकमल चौक -श्याम चौक -जयस्तंभ -प्रभात चौक -जवाहर गेट -सराफा बाजार -भाजी बाजार होत नीळकंठ चौक बुधवारा येथे विसर्जित करण्यात येईल. शोभायात्रेच्या समाप्तीनंतर सर्वांकरिता स्वरूची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोभायात्रेची रूपरेषा असून आपल्या माध्यमातून सर्व अमरावतीकर जनतेला आम्ही सर्व आवाहन करतो की, आपणही शोभायात्रा बघावयास आवर्जून आपली उपस्थिती दर्शवून आपल्या राज्याच्या जयंतीच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच सर्व प्रसार माध्यमांच्या संपादक व पत्रकार बंधुभगिनींनी या शोभयात्रेला छायाचित्रांसह प्रसिद्धी द्यावी ही विनंती….
  पत्रकार परिषदेवेळी सर्वश्री माजी आमदार श्रीकांत देशपांडे, शिवसेना माजी नागराध्यक्ष मूर्तिजापूर श्री नानकरामजी नेभनानी, संतोष बद्रे शिवसेना महानगर प्रमुख, आशिष ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख, गुड्डु कत्तलवार शिवसेना शहरप्रमुख बडनेरा, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ अरुणा इंगोले व रेखा खरोडे, वैद्यकीय कक्ष पश्चिम विदर्भ प्रमुख सौ सोनाली देशमुख,शिवसेना संपर्क प्रमुख संजय पळसोदकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने, युवासेना जिल्हाप्रमुख राम पाटील,युवासेना जिल्हा प्रमुख सौ कोमल बद्रे,जिल्हा प्रमुख सौ माया देशमुख, महानगर महिला अध्यक्षा सौ रश्मी तायडे, अमरावती शहर अध्यक्षा सौ वृंदा मुक्तेवार, जेष्ठ शिवसैनिक श्री सतीशदादा बद्रे,बडनेरा शहर अध्यक्षा शारदा पेंदाम,सौ वंदना दार्व्हेकर व सौ सारिकाजी जयस्वाल उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी,वेदांत तालन सरचिटणीस कामगार सेना, शहर संघटक प्रमुख मुकेश उसरे व चैतन्य कचरे,उपशहरप्रमुख मनोज पांडे,नासिरभाई मेमन, अजमत शहा, वाहतूक शहर सुरेश चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख अजय महल्ले,नितेश शर्मा, राजेश धोटे, राजू देवडा, पंकज मुळे,योगेश भाकरे,रुद्र तिवारी, करण यादव, प्रभागप्रमुख राजेश पाठक,शुभम साबळे,अक्षय कुलकर्णी,चैतन्य कट्यारमल,युवासेना उपजिल्हा प्रमुख रुद्र हरने,सागर बद्रे,युवासेना उपशहरप्रमुख सुरज बरडे,अखिल ठाकरे ईत्यादी बहुसंख्य पदाधिकारी, शिवसैनिक,युवासैनिक, महिला आघाडी, कामगार सेना पदाधिकारी, वैद्यकीय कक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close