समाप्तीला त्याने थंड डोक्याने समाप्त केले आणि पोलिसांना कळवले
कोलकाता / नवप्रहार मीडिया
एखादा साधारण व्यक्ती खून करून एकदम थंड डोक्याने घरातील सर्व कामे करून इतकाच काय तर मुलांचा नास्ता तयार करून त्यांना ट्युशन ला पाठवून नंतर पोलिसात कॉल करून आपल्या गुन्ह्याची कबुली देईल याची कल्पना आपण करू शकत नाही. पण पश्चिम बंगाल च्या बेहाल मध्ये असा प्रकार उघड झाला आहे.
पश्चिम बंगालमधील बेहालामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेतील पतीने अत्यंत थंड डोक्याने हे कृत्य केलं आहे. पतीने पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पतीचं पत्नीशी रात्री एक वाजता भांडण झाल्यानंतर त्याने गळा दाबून तिचा खून केला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने दिलेल्या माहितीनुसार 41 वर्षांच्या कार्तिक दासने आपली पत्नी समाप्ती हिची गळा दाबून हत्या केली आहे. ती 28 वर्षांची होती. रात्री एकच्या दरम्यान त्याने हे कृत्य केलं आणि तिचा मृतदेह झाकून ठेवला.
सकाळी लवकर उठून त्याने घरातील कामं आवरली. मुलांसाठी नाश्ता तयार करुन, त्यांचं आवरुन त्यांना ट्युशनसाठी पाठवलं आणि साडेनऊच्या सुमारास पोलिसांना फोन करुन आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. दास याचं किराणा आणि मांस विक्रीचं दुकान आहे. पोलिसांना फोनवर घटनेची माहिती दिल्यानंतर ‘मी घरी तुमची वाट बघत आहे’ असंही त्याने सांगितलं. पोलीस येईपर्यंत त्याने मुलांची बॅग भरुन ठेवली. सासूला फोन करुन मुलांना ट्युशनहून घेऊन येण्याबाबतही त्याने फोन करुन कळवून ठेवलं.
त्यानंतर पोलीस येईपर्यंत तो शांतपणे पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. आपल्या पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याचा दास याला संशय होता. त्यामुळेच त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. त्या दिवशीही असेच वाद विकोपाला गेले आणि रागाच्याभरात दासने पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारलं.
पत्नीला ठार मारण्यापूर्वी त्याने मुलांना कुठे बाहेर पाठवलं होतं का या बाबत आम्ही तपास करत आहोत. पोलिसांना बोलवण्यापूर्वी त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे,’ असं पोलिसांनी सांगितलं. दास समाप्तीचा छळ करायचा असं तिच्या नातेवाईकांनी माध्यमांना सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.