धूमधड्याक्यात साजरी झाली शिवजयंती….

—शिवसेना अमरावती महानगराचे यशस्वी आयोजन
प्रतिनिधी/अमरावती (28 मार्च 2024)
सालवार तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती शिवसेना अमरावती महानगर तर्फे मोठया उत्सहात व धूमधडक्यात साजरी होत असते. याहीवर्षी आचारसहितेच्या जाचक परवाणग्या नियम- कायदे- कानून चे काटेकोर पणे पालन करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मस्तीत पण शिस्तीत मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीत व शिवघोषात, शिवरायांची आपल्या छत्रपतींची शोभायात्रा काढली, सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री आनंदरावजी अडसूळ, मा खासदार डॉ श्री अनिलजी बोंडे, मा आमदार सौ मनीषाताई कायंदे,माजी आमदार कॅप्टन श्री अभिजित अडसूळ, माजी आमदार श्री श्रीकांतजी देशपांडे, नामांकित ऍडव्होकेट श्री प्रशांतजी देशपांडे, श्री नानकरामजी नेभनांनी माजी नगर अध्यक्ष मूर्तिजापूर व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री निशांत हरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करून शोभायात्रेला बुधवारा आझाद हिंद मंडळ येथील हरिभाऊ कलोती सभागृहापासून सुरुवात करण्यात आली. ढोलपथक बाभुळगावचे प्रसिद्ध ताशे, उज्जैन येथील संदल व डीजे च्या तालावर शिवरायांचे गुणगान गात नाचत तरुणाई निघाली, घोड्यावर स्वार बाल शिवाजी राज्यांचा व जिजाऊ मातेच्या रुपात विराजमान असलेल्या चिरंजीव गौरव गारोले व कुमारी ऋतिका आलेकर या चिमुकल्यामुळे संपूर्ण आसमंन्त प्रचंड तेजोमय असा जाणवत होता. विविध देव देविकांचे तसेंच महापुरुषांच्या मूर्तिरूप अमृताचे अमरावतीकर जनता रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून प्राशन करत होते.सुमारे पंधरा ट्रॅक्टर वरील विविध महापुरुषांचे जसे हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे जिवंतरूपी कटाऊट तसेच शिवतांडव करणाऱ्या चमुने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाची अमरावतीकर जनता मंत्रमुग्ध होऊन दाद देत होती. ही भव्यदिव्य मिरवणूक बघण्यासाठी अमरावतीकर जनता आशीर्वाद देणेकरिता रस्त्यावर उतरली होती.शिवसेना महिला आघाडीची पारंपरिक वेशात फेटे धारण करून जनू जिजाऊ माँ साहेबांच्या रणरागिन्या दिसत होत्या.अतिशय उत्साहापूर्ण अशा वातावरणात निघालेल्या या शिवजयंती च्या मिरवणुकीत हजारो शिवसैनिक, उल्लेखनीय अशी महिला मंडळींची संख्या व युवासेनेच्या तरुणाईची साथ बघवयास मिळाली. गांधी चौक-वकील लाईन -राजकमल चौक -जयस्तंभ चौक -प्रभात चौक होत सरफा बाजार होत विविध शाखांच्या माध्यमातून विविध चौकात महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी, फटाके फोडत, शिवरायांच्या जयघोषात स्वागत करण्यात येत होते.या शिवरायांच्या शोभयात्रेचा शेवट बुधवारा येथे करण्यात आला. बाहेरगाव व रहिवाशी सर्व शिवप्रेमीची ढोलपथक, वाद्यवादक, कार्यकर्ते,पदाधिकारी व परिश्रम घेणाऱ्या सर्वांसाठीच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री संतोष बद्रे (शिवसेना महानगर प्रमुख), आशिष ठाकरे (शिवसेना शहर प्रमुख), गुड्डु कत्तलवार शिवसेना शहरप्रमुख बडनेरा, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ अरुणा इंगोले व सौ रेखा खरोडे, वैद्यकीय कक्ष पश्चिम विदर्भ प्रमुख सौ सोनाली देशमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख बडनेरा संजय पळसोदकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने, युवासेना जिल्हाप्रमुख राम पाटील, युवासेना जिल्हा युवती प्रमुख सौ कोमल बद्रे, जिल्हा प्रमुख सौ माया देशमुख, महानगर महिला अध्यक्षा सौ रश्मी तायडे, अमरावती शहर अध्यक्षा सौ वृंदा मुक्तेवार, बडनेरा शहर अध्यक्षा शारदा पेंदाम,सौ वंदना दार्व्हेकर व सौ सारिकाजी जयस्वाल उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी,विशेष सहकार्य करणारे जेष्ठ शिवसैनिक श्री सतीशदादा बद्रे, वेदांत तालन सरचिटणीस कामगार सेना, शहर संघटक प्रमुख मुकेश उसरे व चैतन्य कचरे, उपशहरप्रमुख मनोज पांडे,नासिरभाई मेमन, अजमत शहा, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष पवन राठी, योगेश मानेकर, शहर संघटक वाहतूक सुरेश चव्हाण, क्रीडा जिल्हा अध्यक्ष समीर कोरपे, शिवसेना उपशहरप्रमुख अजय महल्ले,नितेश शर्मा, राजेश धोटे, राजू देवडा, पंकज मुळे,योगेश भाकरे,रुद्र तिवारी, करण यादव,अतुल परतेकी, राजेश गेडाम प्रभागप्रमुख राजेश पाठक,शुभम साबळे,अक्षय कुलकर्णी,चैतन्य कट्यारमल,युवासेना उपजिल्हा प्रमुख रुद्र हरने,सागर बद्रे,युवासेना उपशहरप्रमुख सुरज बरडे,अखिल ठाकरे,अक्षय सरोदे, निलेश भोयर, शैलेश सावरकर ईत्यादी बहुसंख्य पदाधिकारी, शिवसैनिक,युवासैनिक, महिला आघाडी, कामगार सेना पदाधिकारी, वैद्यकीय कक्ष पदाधिकारी उपस्थित होते.