शैक्षणिक

जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत विद्यार्थ्यांचा गुजरात राज्यात अभ्यासदौरा संपन्न

Spread the love

 

भंडारा दि 9 : समग्र शिक्षा, राष्ट्रीय आविष्कार अभियान (RAA) सन 2022-23 – Exposure Visit Outside State या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्हयातील आदर्श शाळांमधील निवडक 25 विद्यार्थी व 4 शिक्षक तसेच जिल्हा कार्यालयाचा एक प्रतिनिधी असे एकूण 30 विद्यार्थी व शिक्षक/प्रतिनिधी यांचा दि. 28 फेब्रुवारी 2023 ते 6 मार्च 2023 या कालावधीत अहमदाबाद/वडोदरा (गुजरात) येथे शैक्षणिक अभ्यासदौरा यशस्वीरित्या संपन्न झाला.
दि. 28/02/2023 रोजी मा. रमेश पारधी (शिक्षण सभापती, जि. प. भंडारा) व मा. रवींद्र सोनटक्के (शिक्षणधिकारी, प्राथमिक, जि. प. भंडारा) यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून सर्व विद्यार्थ्यांना सदर अभ्यासदौऱ्यासाठी शुभेच्छा देऊन रवाना केले

ह्या अभ्यासदौऱ्याच्या स्थळांमध्ये वस्तूसंग्रहालय, प्राणिसंग्रहालय, तारांगण, वारसा इमारती, अभयारण्ये, माहिती प्रसार केंद्र, भौगोलिक-ऐतिहासिक स्थळे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी स्थळे, धरणे यासारख्या बाबींचा समावेश अपेक्षित होते. त्यानुसार अभ्यासदौरा कालावधीत गुजरात राज्यातील साबरमती आश्रम, रुडाबाईची 5 मजली ऐतिहासिक बावडी, वैष्णोदेवी मंदिर, अक्षरधाम मंदिर, कंकारिया लेक व झू, अटल ब्रीज, सायन्स सिटी (Science Carnival 2023, Nature Park, Hall of Science, Hall of Space, Nature Park, Robotics Gallary, Aquatic Gallary, Life Science Park, Planet Earth व सरदार सरोवर / Statue of Unity (केवडीया, एकता नगर) इत्यादी स्थळांना अभ्यासपूर्ण भेटी देऊन सर्व विद्यार्थी व शिक्षक दि. 6 मार्च 2023 रोजी सकाळी भंडारा येथे सुखरुप परतले.
या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक, वैज्ञानिक, वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन आनंदाची पर्वणी अनुभवता आली. या उपक्रमांबाबत लोकप्रतिनिधी, शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले. असे।
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, भंडारा यांनी कळविले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close