सामाजिक

झोपडीला आग लागून शेतकऱ्यांचा एक लाख पन्नास हजारांचा कांदा जळून खाक

Spread the love

तुरखेड शेतशिवारातील घटना

अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे )
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड येथे सोमवारी दुपारच्या सुमारास अमोल कोल्हे यांच्या शेतातील झोपडीला आग लागून स्पींकंर, जनावरांचे असलेले खाद्य कुटारा सह सुमारे शंभर किटंल कांदा आणि कृषी उपयोगी साहित्य अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत कोल्हे कुटुंबीयांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अमोल मधुकरराव कोल्हे यांनी
शेतातील उत्पादित केलेल्या कांदा साठवण्यासाठी झोपड्या बांधलेल्या आहेत. सध्या कांद्याला पुरेसा भाव मिळत नसल्याने त्यांनी जवळपास शंभर किटंल भरून कांदा शेतातील झोपडीत साठवलेला होता. दुपारच्या वेळेस शेतात कोणीही नसताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना धूराचे लोट येताना दिसले. त्यांनी शेताच्या झोपडी कडे धाव घेतली असता तेथील कांद्याला आग लागली असल्याचे त्यांना दिसून आले. या शेतकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला असल्याने झोपडीतील साठवलेल्या सर्व कांद्या सह कुटार आणि शेती उपयोगी साहित्य संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close