राजकिय

फडणवीसांनी दिल्ली वारी राज्यात घडणार का काही भारी ? 

Spread the love

नागपूर /  नवप्रहार वृत्तसेवा 

           नागपूर विमानतळावर उतरलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष विमानाने दिल्ली रवाना झाल्याने राजकीय चर्चा रंगत आहेत . यापूर्वी शिंदे अजित पवार आणि फडणवीस दिल्लीत असतांना अजित दादा यांचा दुसऱ्या दिवशी सरकार मध्ये प्रवेश झाला होता. शिंदे आणि पवार दिल्लीत असतांना फडणवीस यांची तडकाफडकी दिल्ली वारी मुळे फडनवीसांची दिल्ली वारी राज्यात घडणार का काही भारी  ? अशी चर्चा रंगली आहे .

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आधीच एनडीएच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीला गेले आहेत. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का? हा प्रश्न महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे आणि फडणवीस हे एकत्र दिल्लीला गेले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

विधी मंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ क्लिप प्रकरणावरुन घमासान बघायला मिळालं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना संबंधित व्हिडीओ क्लिप प्रकरणी वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आठ तासांची क्लिप विधान परिषदेच्या सभापतींकडे सादर केली आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रकरणी राज्यभरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं.

 

 

महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षांच्या गोटात जोरदार खलबतं

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडण्याची शक्यता आहे. असं असताना महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहे. मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची एकत्रित बैठक सुरु आहे. तीनही पक्षांच्या समन्वय समितीची ही बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे./

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close