विद्यार्थ्यांकडून शिक्षिकेचे लैंगिक शोषण

विशेष प्रतिनिधी /नवी मुंबई
शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण याबद्दल नेहमीच वाचायला मिळते. पण विद्यार्थ्या कडून शिक्षिकेचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार नेरुळ येथील एका नामांकित कॉलेज मध्ये घडला आहे. आणि ते ही कायद्याचे शिक्षण देणाऱ्या लॉ कॉलेज मध्ये .
मागील वर्षी त्याचं शिक्षण पूर्ण झालं, तरीही तो प्राध्यापिकेचा पिच्छा सोडत नव्हता. तो कॉलेजमध्ये येऊन प्राध्यापिकेला त्रास देत होता. पीडित प्राध्यापिकेकडे वारंवार लैंगिक सुखाची मागणी करत होता. याप्रकरणी पीडितेनं नेरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित आरोपी विद्यार्थ्याचं वय ५० असून तो मागील काही वर्षांपासून नेरुळ इथल्या लॉ कॉलेजमध्ये शिकायला होता. तर याच कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या ३५ वर्षीय पीडित शिक्षिकेकडे तो वारंवार लैंगिक सुखाची मागणी करत होता. पीडितेनं आरोपीला स्पष्ट नकार दिल्यानंतर, आरोपीनं पीडितेची बदनामी सुरू केली. त्याने कॉलेजमधील दोन इतर महिला सहकाऱ्यांना हाताशी धरून खोटी माहिती पसरवण्यास सुरुवात केली. शिक्षिकेविरोधात खोट्या तक्रारी द्यायला सुरुवात केली. यामुळे पीडित प्राध्यापिकेला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं.
वारंवार समज देऊनही आरोपीचा त्रास कमी होत नव्हता. शिवाय या वर्षी आरोपीचं कायद्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तरीही तो कॉलेजमध्ये येऊन महिला शिक्षिकेला त्रास देत होता. अखेर आरोपीच्या लैंगिक आणि मानसिक छळाला कंटाळून पीडित महिलेनं नेरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्याचं कळताच आरोपी फरार झाला आहे. नेरुळ पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पण एका नामांकित कॉलेजमध्ये अशाप्रकारे प्राध्यापिकेचा छळ होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर महाविद्यालयासह विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.