हटके
काय म्हणता ….. ? मॉल मधून चालवल्या जात होते सेक्स रॅकेट

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
मॉल मध्ये विविध वस्तू आणि सिनेमा थिएटर या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील पण मॉल मध्ये सेक्स रॅकेट हा प्रकार तुमच्या आमच्यासाठी नवीनच म्हणावा लागेल. पण मॉल मध्ये चालत असलेल्या सेक्स रॅकेट चा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. दिल्ली आणि प्रीतविहार पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणाहून 9 तरुणींना गब्यात घेतले आहे. तर स्पा सेंटर चा व्यवस्थापक अजयसिंह हा फरार झाला आहे. .
राजधानीतील एका मॉल मधील ‘ टू ब्लिप्स ‘ नावाच्या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेस सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी शरीर विक्री करणाऱ्या 9 तरुणींना रंगेहात पकडले आहे.
दिल्ली पोलिसांना या संदर्भात अगोदरच माहिती मिळाली होती. यानंतर दिल्ली आणि प्रीत विहार पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने स्पामध्ये छापा टाकला. यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. एका बनावट ग्राहकाने स्पासोबत डील फायनल करताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली. स्पाचा मॅनेजर अजय सिंग हा फरार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, “स्पामध्ये एकूण ९ तरुणी आढळल्या आहेत. स्पाचा व्यवस्थापक अजय सिंग फरार आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, २४ मार्च रोजी एका मॉलमधील ट्रू ब्लिस स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवल्या जात असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला स्पामध्ये पाठवले होते. सुरुवातीला त्या ग्राहकाकडून १ हजार रुपये घेतले. यानंतर त्याला ९ तरुणी दाखवल्या त्यापैकी एक निवडण्यास सांगितले. बनावट ग्राहकाकडून त्यांनी आणखी २ हजार रुपये घेतले. तेव्हाच बनावट ग्राहकाने मिस्ड कॉल देऊन पोलीस टीमला अलर्ट केले, त्यानंतर टीमने स्पावर छापा टाकला आणि आरोपीला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्पा सेंटर गेल्या दोन वर्षापासून चालवले जात आहे. याअगोदरही या स्पाविरोधात कारवाई केली होती.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |