सामाजिक

राईसमिल परिसरात अनोळखी मृतदेह

Spread the love

 

गडचिरोली, ता. २३ : येथील आरमोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत २ किमी अंतरावर असणाऱ्या बर्डी येथील जिवानी राईसमील परिसरात रविवार (ता. २२)दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह पुरुषाचा असून अजूनपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
बर्डी येथील राहुल तुमासरे यांना जिवानी राईसमिल परिसरात एक अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत दिसली. आजूबाजूचे कोणीही त्या व्यक्तीला ओळखत नसल्याने याबाबतची माहिती त्यांनी आरमोरी पोलिस स्टेशन येथे दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून त्या व्यक्तीला खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात उपचारकरिता नेले असता वैद्यकीय अधिकायांनी त्याला तपासून ती व्यक्ती मृत असल्याचे घोषित केले. या मृत व्यक्तीच्या अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट आहे. गळ्यात पांढऱ्या रंगाचा धागा बांधलेला आहे. वर्ण सावळा, डोक्यावर पुढील बाजूस टक्कल व मागील बाजूस काळे केस आहेत. ही व्यक्ती आरमोरी परिसरातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा मृतदेह हा सध्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.या व्यक्तीची काही ओळख पटल्यास नातेवाइकांनी आरमोरी पोलिस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक यांनी केले आहे.
————————————-

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close