ज्येष्ठ समाजसेवक स्व.राजीवपंत पाटील
चमक बु ता.अचलपुर जि.अमरावती या गावात 7 जानेवारीला मनाला अत्यंत दुःख देणारी घटना घडली, ती म्हणजे राजीवपंत पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळी 11 वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यातच ते स्वर्गवासी झाले. सकाळी सर्वांच्या भेटी घेतल्या लहान थोरापासुन ही भेट अखेरचीच ठरली. गावातील सर्वसमावेशक व्यक्तीमत्व,सर्व जातीसमुदायातील लोकप्रिय व्यक्ती.दू:खी, गरिबांच्या अडचणीत मदतीचा हात देणारे. अंत्यंत प्रामाणिक.मेहनती शेतकरी, गावातील धर्मकार्यात सहभाग, दुसऱ्याच्या समस्या समजून स्व-ताकदीचा समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे.राजकारणाचा गावविकासासाठी उपयोग करुन घेणारे सुजाण व्यक्ती एकप्रकारे गावाचे पालकत्व स्वीकारलेले राजीवजी म्हणजे गावातला प्रमुख माणूस, माणसासारखा माणूस आम्हाला सोडून गेला, गावातल्या प्रत्येकाचे हृदय थरथरत होते, गावाचा प्रमुख नेता कसा आहे ,त्यावर गाव अवलंबून असते, स्व.राजीवपंत पाटील यांचा दरारा होता, ते काँग्रेसची एकनिष्ठ राहिले.”मरावे परी कीर्ती रुपी उरावे”, या साधुक्ती प्रमाणे पाटील जगले, आपल्या प्रत्येक कृतीतून समाजवाद त्यांनी निर्माण केला, गावातल्या गरीबातील गरिब असो श्रीमंत असो, सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची प्रवृत्ती हितकारक होती. समाजकारण करून त्यांनी पंचक्रोशीत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. ना कोणाबद्दल दु:साहस,ना विरोध, कपोलकल्पित मन नव्हतेच .दुसऱ्याबद्दल अंतकरण निर्मळ होते. बिनधास्त जगायचं, असं सर्व काही व्यवस्थित होतं, सर्व जनतेसोबत कौटुंबिक संबंध होते, ज्याला शब्द दिला तो पाळायचाच , राजकारणातील अनेक लोकांची संबध आला पण संबध कधीही बिघडु दिले नाही.
आयुष्यभर काँग्रेसची सेवा केली, कोणाच्या आर्थिक लाचलुचपतीला बळी पडले नाही, आयुष्यात हा दाग त्यांना लागला नाही, लावण्याचा कधी प्रयत्नही केला नाही, 70 वर्षे नऊ महिने चार दिवस एवढे जीवन त्यांच्या वाट्याला आले, जीवन अत्यंत साधे जगले, फक्त समाज एवढेच ध्येय त्यांनी जीवन जगताना ठेवले होते. आता असा माणूस चमक गावात होणे नाही. त्यांच्या जाण्याने वातावरण अत्यंत भाऊक झाले होते, मुलांच्या ,मुलींच्या डोळ्यातून आसवे पडत होती, पत्नीच्या डोळ्यातून जे आसवे बाहेर निघत होती, ती स्वर्गीय राजूपंत पाटील यांचे कर्म होते,स्वर्गीय राजूपंत पाटील यांना दोन मुले व दोन मुली आहेत. स्व.राजीवपंत पाटील हे शेवटपर्यंत एकनिष्ठ राहीले, शब्द प्रमाण होता. पैशापेक्षा शब्दाला खुप महत्व दिले. याची प्रचीती अंत्ययात्रेमध्ये येत असते, हजारो लोक जेव्हा अत्यंयात्रेमध्ये येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्वच सांगत असतात ,प्रत्येकाला मृत्यु येणारच पण आयुष्याच्या शेवटी तुम्ही जनतेला काय दिले हे महत्वाचे ठरते ,प्रत्येकाने मृत्युला आनंदाने आपण सामोरे जावुच पण स्व.राजुपंत पाटील यांच्या कार्याची शिदोरी जनतेच्या हदयामध्ये आहेच आम्ही कधीही विसरणार नाही.मनुष्य जातो ,पण आपले कर्तव्य सेबत घेवुन जातो, आम्ही खुप नाही तर स्व राजीवपंत पाटील यांच्या काही आठवणी डोळयामध्ये साठवल्याशिवाय राहणार नाही ,असा माणुस आता होणे नाही ज्या मनुष्यांची गरज समाजाला असते देव त्यांना लवकरच देवाघरी नेतो हे लिहतांना डोळयात पाणी येते. लेख खुप मोठा होईल ,लिहण्यासारखे खुप आहे पण शब्दाला मर्यादा आहेत. त्यामुळे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व माझ्या शब्दांना विराम देतो.
श्री.विनय सुदामपंत शेलुरे
मोर्शी