लाखनी येथील समर्थ विदयालय परीसरात सेल्फी विथ प्लांटस कार्यक्रमाचे संपन्न
भारतीय मानवाधिकार असोसिएशन चे आयोजन
लाखनी – ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या म्हणीप्रमाणे झाडे जीवंत असतील तरच मानवसृष्टीचे अस्तित्व टिकून राहील. कारण मानवाला श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेला अॉक्सीजन झाडेच पुरवितात.
मानवसमुहाला वृक्षांचे महत्व समजून यावे व त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी या प्रामाणिक हेतूने भारतीय मानवाधिकार असोसिएशन भंडारा जिल्हा च्या वतीने लाखनी येथील गांधी विदयालय परीसरात ” सेल्फी विथ प्लांटस ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भारतीय मानवाधिकार असोसिएशन भंडारा जिल्हा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सेल्फी काढण्यात आली. याप्रसंगी समर्थ विदयालयाचे बडवाईक सर , भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे भंडारा जिल्हाध्यक्ष संजय नासरे , महीला जिल्हाध्यक्ष डॉ.वैष्णवी सुनील लेंडे , जिल्हा उपाध्यक्ष अरविंद लांजेवार , कार्यकर्ता उमराव सेलोकर , यशवंत वैदय , नेहाल कांबळे व शालेय विदयार्थीनी वर्ग उपस्थित होता.