पवनी ते मांगली बस सेवा चालू करा
पवनी- पवनी तालुक्यातील मौजा. मांगली(चौ) ,इसापूर,उमरी,पौना मार्गावरील बससेवा अनेक दिवसांपासून बंद आहे. विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष चालु झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना विद्यालयात येण्या-जाण्यासाठी
पर्यायी व्यवस्था नाही, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शैक्षाणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो आहे. ही बाब लक्षात घेता मांगली(चौ) चे ग्रा. पं.सदस्य चेतन पडोळे यांच्या नेतृत्वात मा.
आगार प्रमुख राज्य मार्ग परिवहन महामंडळ पवनी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी चेतन पडोळे , मनीष गभने , विक्की रामटेके, जगदीश हटवार ,सोहम सावरबांधे व ई.शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थांना सात दिवसाच्या आत बससेवा चालु करुण देण्याचे आश्वासन मी दिले. बससेवा सात दिवसाच्या आत चालु न झाल्यास बस स्थानकात समस्त विद्यार्थ्याच्या नेतृत्वात तिव्र आंदोलनाचा इशारा त्यावेळी दिला.
-चेतन पडोळे.