सामाजिक

दुभाजक बनले कचराकुंडी, नागरिकांच्या व शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यात धोका.

Spread the love

 

रस्त्याने दुर्गंधीचे साम्राज्य…

यवतमाळ / प्रतिनिधी

शहराचा अत्यंत रहदारीचा रस्ता म्हणून ओळख असलेला बस स्टॅन्ड ते लोहारा रोड हा सर्वांना प्रचलित आहे. या रस्त्याने महत्त्वाच्या गाड्यां ची नेहमी वळदळ असते.
यातच आता लोकसभा निवडणुकीत झाली आहे. या निवडणुकीच्या ईव्हीएम मशीन याच रोडवरील शासकीय गोडाऊन मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. त्याकरिता शासकीय कर्मचारी बंदोबस्ता करीता तैनात केले आहे. याकरिता अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची वर्दळ या रस्त्याने होत असते व तसेच अनेक कर्मचारी आपली सेवा येथे निरंतर देत आहे.

मात्र या रस्त्यावरील असलेल्या दुभाजकाचा वापर कचराकुंडी प्रमाणे करत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. या दुभाजकाचा वापर येथील नागरिक कचरा टाकण्याकरिता करीत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नेताजी नगर परिसरातील नागरिकांचे व प्रवाशांचे आरोग्य बिघडत असून शासकीय गोडाऊन मध्ये ईव्हीएम मशीन ला सुरक्षा करिता सेवेत असणारे शासकीय कर्मचाऱ्यांचे सुद्धा आरोग्य धोक्यात आले आहे.
या रस्त्याचे बांधकाम गत वर्षातच झाले असून कॉन्ट्रॅक्टर यांनी या
दुभाजकामध्ये माती न भरल्यामुळे तसेच दुभाजकाचे सौंदर्यीकरण न झाल्याने त्याखालील जागेमध्ये नेताजी नगर परिसरातील नागरिक तसेच व्यावसायिक व इतर त्या दुभाजकाचा वापर कचराकुंडी प्रमाणे करत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
तसेच सध्या या महत्त्वाच्या रस्त्यावरील दुभाजक हा चर्चेचा विषय बनला असून अनेक वेळा शहरातील नागरिकांनी या दुभाजकामध्ये कचरा टाकत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाला सांगण्यात आले मात्र त्यावर अद्यापही कुठली कारवाई प्रशासनाने केली नाही.

 

या रस्त्याच्या बांधकामाचे ठेकेदार व त्या विभागात तील कर्मचाऱ्यांनी या दुभाजकाकडे लक्ष न दिल्याने त्यामध्ये माती न भरल्यामुळे ती जागा खाली असल्याने याचा सर्रास वापर हा कचरा टाकण्याकरिता होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असून दुर्गंधी वाढत चालली आहे.

 

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याच्या थोतांड चर्चा केल्या जात आहे. वास्तविक मात्र शहरातील मध्यभागी असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि शहरातील मुख्य रस्त्याची ओळख असलेल्या दुभाजकामध्ये कुठल्याही झाडाची लागवड केली नाही. तसेच त्या दुभाजका कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून त्यामध्ये माती न टाकल्याने हा कचरा नागरिकांच्या माध्यमातून या दुभाजकांमध्ये टाकल्या जात आहे
हे प्रशासनाला माहीत असून सुद्धा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close