शाळा प्रवेशोत्सव दिनाचे प्रार्थमिक शाळेत आयोजन
वरूड/तूषार अकर्ते
शेंदुरजनाघाट न. प. प्राथमिक शाळा क्र.१ येथे शाळा प्रवेशोत्सव दिंडी शहरातून काढून प्रवेशोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या प्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील सावरकर व न. प. प्रशासन अधिकारी विजय बेलसरे व शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच न.प.गुरुकुल कॉन्व्हेंटच्या प्रेरणास्थान किर्तीमाला धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.या वेळी धुर्वे यांनी विद्यार्थ्यांना प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.त्या नंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास शोभा लेकुरवाळे आरती नारनवरे, कांता हरले, आशिष तडस, नितीन गायकवाड, सविता बोबडे, शालिनी फरकडे, गणोरकर इ.शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संदीप कोकाटे यांनी तर उपस्थितांचे आभार नेहा सुपले यांनी मानले आहे.या कार्यक्रमाकरिता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,माता पालक सदस्य, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करुन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.