सावनेर पोलीसांची प्रतिबंधक सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या इसमास अटक
नागपूर / प्रतिनिधी
मा. पोलीस अधीक्षक सा. व अपर पोलीस अधीक्षक सा. नागपूर ग्रामीण यांनी नागपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्याप्रमाणे त्यांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी सा. सावनेर विभाग सावनेर अतिरीक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग श्री. बापू रोहम यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंदयावर कारवाई करीत असतांना दिनांक १०/०६/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मानकर व सहायक पोलीस निरीक्षक श्री. शरद भस्मे यांना माहिती मिळाली की, महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध सुगंधी तंबाखुची चार चाकी गाडीतून छिंदवाडा ते नागपूर रोडने अवैध सुगंधी तंबाखुची वाहतुक होत आहे त्यानुसार पाटणसावंगी टोलनाका येथे सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस हवालदार सुरेंद्र वासनिक, माणिक शेरे, पोलीस शिपाई अंकुश मुळे, अशोक निस्ताने सर्व पोलीस स्टेशन सावनेर यांनी नाकाबंदी करून गाड़ी नंबर एम. एच-४० / सी. एच- ९३६२ ही संशयास्पदरीत्या मिळुन आल्याने तिची पाहणी केली असता सदर गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या अवैध सुगंधी तंबाखु किंमती ६०५१० /- रू. त्यात १) राजश्री पान मसाला १०३ पाकीटे प्रत्येक पाकीट १८० ग्रॅमचे किंमती अंदाजे २७८१० /- रू. २) सुगंधी तंबाखु बागवान चे १६ डब्बे प्रत्येक डब्बा ५०० ग्रॅम किमती ११६०० /- रू. ३) सुगंधी तंबाखु ब्लॅक लेबल १०० पाकीटे प्रत्येक पाकीट ३० ग्रॅम किमती ३००० /- रू. ४) सुगंधी तबाखु गोल्ड जी २० चे २१ पाकीटे प्रत्येक पाकीट ०१ किलो किंमती १२६०० /- रू. ५) सुगंधी तंबाखु रिमझीम १० पाकीटे प्रत्येक पाकीट ०१ किलो किमती ५६०० /- रू. व स्विफ्ट गाडी नंबर एम. एच. ४० / सी. एच. – ९३६२ किंमती ६ लाख रूपये असा एकुण ६,६०५१० /- रूपयाचा मुद्देमाल कपील संतोष शाहु, वय २३ वर्ष, रा. वार्ड क्र. ०५ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बोखारा नागपूर यांचे ताब्यातील गाडीत मिळुन आल्याने त्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग म. रा. नागपूर यांना कळविले असता सौ. स्मिता बाभरे अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी येवुन कायदेशीर कार्यवाही करून त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन सावनेर येथे अप. क्र. ५३६ / २०२३ कलम १७२, १७३, १८८, ३२८ भादंवि सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्या अंतर्गत नियम व नियमन २०११ चे कलम २६ (१), २६ (२), २७(३) (e), ३० (२) (a) सहवाचन कलम ३ (१) (zz) (iv) (iii) (v) शिक्षापात्र कलम ५९ नुसार अपराध दाखल झाला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक सा. नागपूर ग्रामीण श्री डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, अति. कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग श्री. बापू रोहम, पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मानकर, सपोनि शरद भस्मे, पोलीस हवालदार सुरेंद्र वासनिक, माणिक शेरे, पोलीस शिपाई अंकुश मुळे, अशोक निस्ताने सर्व पोलीस स्टेशन सावनेर यांनी केली आहे.