हटके

थरारक व्हिडीओ ; डोंगराच्या कडांवर अडकले तीन तरुण 

Spread the love

                  काही लोकांना सहसिक कामे करण्याची आवड असते. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. स्वतःचा जीव देखील धोक्यात घालायला ते मागेपुढे पाहत नाहीत. अनेक वेळा ते निसर्गाशी सुद्धा स्पर्धा करतात. पण निसर्ग हा शेवटी निसर्गच. कारण मानवाने कितीही प्रगती केली तरी ती निसर्गावर मात करू शकला नाही. माझ्या पुढे माणूस कमीच आहे हे अनेकवेळा निसर्गाने दाखवून दिले आहे. तरी सुद्धा माणूस निसर्गाशी खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि स्वतःवर संकट ओढवून घेतो. निसर्गा सोबत आगाऊपणा दाखवणाऱ्या लोकांचे काय हाल होतात. हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.

आपण निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचा  प्रत्यंतर अनेकदा येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्यापुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. तरीही काही जण निसर्गाला आव्हान देतात. मात्र, तुमची एक चूक तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे, यासंबंधीचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

डोंगराच्या कड्यावर अडकले तीन मित्र

आयुष्यात काहीतरी थ्रिल हवं, यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. काही लोक अ‍ॅडव्हेंचरसाठी आपला जीव धोक्यात घालतात, तर काही लोक थ्रिलच्या नादात आपला जीव गमावून बसतात. आता अशीच काहीशी धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामध्ये तीन मित्र डोंगराच्या कड्यावर अडकले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पावसाळ्यात अशा ठिकाणी जाण्याआधी १०० वेळा विचार कराल.

निसर्गातील एक चूक अन् खेळ खल्लास

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुण एका डोंगराच्या कड्यावर गेले आहेत. या कड्यावर एका पावलाएवढंही अंतर नाहीये. त्या ठिकाणी थोडीशी जरी चूक झाली तरी त्या तीन तरुणांचा जीव जाऊ शकतो. मात्र, हे तरुण जीवाची पर्वा न करता, त्या ठिकाणी पोहोचले आणि अडकले. तेथे एकाचा जरी पाय घसरला तरी हे तीनही तरुण खाली दरीत कोसळू शकतात अशी परिस्थिती या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे तीनही तरुण कॉलजचे विद्यार्थी दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर बॅग दिसत असून, तीनही तरुण डोंगराच्या कड्यावर एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पोटात गोळा येईल. व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजलेले नाही; पण हा व्हिडीओ महाराष्ट्रातीलच एका किल्ल्यावरचा असल्याचा अंदाज आहे.

इन्स्टाग्रामवर __rahul_ly_143 नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तुमची निसर्गातील एक चूक तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.’ त्यावर नेटकऱ्यांनी अनेक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘कोणीही यमराजांच्या कामात अडचण आणू नये.’ ‘या लोकांना तिकडं जायची गरजच काय; पण?’ अशा या प्रतिक्रिया आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close