क्राइम

तिला काय माहित बर्थडे नाही तिचा काळ बोलवत आहे

Spread the love

वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलावले …….

गाझियाबाद / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                   महिलेला वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. सबिनला याची पुसटशीही कल्पना नव्हती की तिला वाढदिवसाची पार्टी नाही नंतर तिचा काळ बोलवत आहे. सगळ्यात महत्वाचे असे की हे कांड फक्त संशयावरून घडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 8 लोकांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी पती पत्नी फरार आहेत.

4 लाख रुपयांचे दागिने आणि कॅश चोरीच्या प्रकरणातून हे सर्व घडलं. घरात बर्थ डे पार्टी सुरु असताना, 4 लाख रुपयांचे दागिने चोरी झाल्याचा आरोप रमेश आणि त्याची पत्नी हिनाने केला. रमेशन आधी पत्नी हिनावर संशय घेतला व तिचा छळ केला. त्यानंतर त्याने सबिनावर संशय व्यक्त केला. नवरा-बायको दोघांनी सबिनावर चोरीचा आळ घातला.

रमेश, हिना आणि त्यांच्या नातेवाईकांनी मिळून सबिनाला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. चोरीचा गुन्हा मान्य करावा, यासाठी तिच्या शरीरावर जखमा केल्या. सबिनासोबत आलेल्या चुलत बहिणीला तसेच गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा मारहाण केली. चोरीच्या संशयातून नातेवाईकांनी 22 वर्षाच्या सबिनाला मरेपर्यंत मारहाण केली. सबिनाला मारहाण सुरु असताना तिचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी मोठ्या आवाजात म्युझिक सुरु होतं.

मारहाणीत सबिनाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. मोठ्या आवाजात म्युझिक सुरु होतं. नंतर म्युझिकमुळे आवाज होत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तिथे दाखल झाल्यानंतर पोलिसांना सबिनाचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सबिनाची चुलत बहिण आणि ड्रायव्हरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलय. सबिनाच्या बहिणीच्या तक्रारीवरुन गाझियाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आठ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केलीय, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रवी कुमार यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close