हटके

उंटाचा मालकावर हल्ला ; डोकं चावून चावून मारले 

Spread the love
चुरू ( राजस्थान) / नवप्रहार मीडिया नेटवर्क 
                  उंट हा शांत स्वभावाचा प्राणी आहे. उंटाला वाळवंटातील जहाज ही उपमा मिळाली आहे.राजस्थान मधील लोक उंटाला पाळतात. आणि त्यांच्या माध्यमातून माल वाहतूक करून उपजीविका चालवतात.  इतर प्राण्यांप्रमाणे चवताळलेल्या उंटाने मालकावर हल्ला केल्याच्या घटना सहसा घडत नाहीत. पण एका चवताळलेल्या उंटाने मालकावर हल्ला करून त्याचे डोके चावल्याची घटना घडली आहे. मुख्य म्हणजे या घटने नंतर उंट मालकाच्या मृतदेहा शेजारीच बसला होता.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. मालकाला मारल्यानंतर उंट तिथेच बसून राहिला. नंतर कसा तरी लोकांनी उंटजवळून मृतदेह बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना चुरू जिल्ह्यातील सरदारशहर भागातील अजितसर गावात घडली. तेथे शुक्रवारी एका उंटाने मालकाला ठार मारले. रामलाल असे उंटाच्या हातून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे वय 48 वर्षे होते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतात उंटाने अचानक मालकावर हल्ला केला. त्यानंतर त्याचे डोके तोंडात घेऊन चघळले. यामुळे रामलाल तळमळला पण तो काही करू शकला नाही.

उंटाने रामलालचे डोके इतके चावले की त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर उंट मालकाच्या मृतदेहाजवळ जाऊन बसला. रामलालचे नातेवाईक व गावकऱ्यांना समजताच ते तेथे पोहोचले. तेथील अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. पण उंटाच्या जवळ जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. नंतर लोकांनी काळजीपूर्वक रामलालला तेथून काढले. यादरम्यान लोकांनी त्याचा व्हिडिओही बनवला.

कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी रामलालला घेऊन स्थानिक हॉस्पिटल गाठले. तेथे डॉक्टरांनी रामलालला मृत घोषित केले. रामलालला मृत घोषित करताच त्याच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताचे वृत्त समजताच अजितसर गावात शोककळा पसरली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close