बैलाने वाचवले मालकाचे प्राण
बीड / नवप्रहार डेस्क
म्हणतात न की तुम्ही जर पाळीव जनावराला जीव लावला की मग ते देखील तुम्हाला प्रेम करतात. कुत्रा , मांजरीने अनेक वेळा आपला जीव धोक्यात टाकून आपल्या मालकाचे प्राण वाचविले असल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. नुकत्याच केरळ मध्ये झालेल्या भूस्खलना मुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. पण एका व्यक्तीने या नैसर्गिक आपत्ती पूर्वी त्यांना त्यांच्या पाळीव गाईने आपत्ती चे संकेत दिले होते. आणि त्यामुळेच त्यांचे , कुटुंबीयांचे आणि शेजाऱ्यांचे प्राण वाचल्याचे त्यांनी मीडिया लां सांगितले आहे.
बीड मधील लोणी घात येथून बैलाने मालकाचे प्राण वाचवले असल्याची अविश्वसनीय बातमी समोर येत आहे. आपल्या लाडक्या बैलांचे मालक बिभीषण कदम यांच्याबाबत ही घटना घडली आहे.
काल बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसात एका झाडाखाली पती-पत्नी उभे असताना त्यांच्यावर वीज कोसळली. यात बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीरित्या जखमी झाल्या. त्यांना चालता पण येत नव्हतं. अर्धा तास हे दोघेही पती-पत्नी बेशुद्ध पडले होते.
नंतर त्यांना शुद्ध आली. त्यांनी कसेबसे बैलगाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. याच वेळी बाजूला असलेला प्रधान आणि राजा ही दोन बैल मदतीला धावले. बिभीषण यांनी चल आता घरी सोड असे म्हणताच लाडका राजाने गुडघ्यावर बसून जू स्वतःच्या मानेवर घेतला आणि प्रधानच्य़ा साथीने तब्बल साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी मालकाला सोडलं.
घरी पोहोचताच राजा बैलाने जोरात हंबरडा फोडला. नंतर शेतकऱ्याने घडलेला प्रसंग सांगितला. यावेळी बिभीषण यांचा मुलगा आणि सून धावून आले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. यामुळे यांचा जीव वाचला. यामुळे या बैलांच्या सतर्कतेमुळे मालकाचा जीव वाचला.
दरम्यान, या घटनेची राज्यात चर्चा सुरू आहे. आपल्या लाडक्या बैलाला गोंजारणारे बिभीषण कदम यांचा आपल्या बैलांवर खूप जीव होता. यामुळे बैलांना देखील आपल्या मालकाच्या परिस्थितीची जाणीव झाली. यामुळे मृत्यूच्या दाढेतून याच बैलाने बिभीषण आणि त्यांच्या पत्नीला बाहेर काढलं.
दरम्यान, राज्यासह बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसात हे पती-पत्नी उभे असताना त्यांच्यावर वीज कोसळली. यात बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीरित्या जखमी झाल्या. मात्र या बैलांमुळे त्यांचा जीव वाचला आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.