शेती विषयक

मुकिंदपूर ते गोंडगव्हान पांदण रस्ता अर्धवट, एस.डी.ओ.ला शेतकऱ्यांनी दिले निवेदन.

Spread the love

नेर:- नवनाथ दरोई
मुकिंदपुर, पिंपरी ईजरा, इसापूर ते गोडगव्हाण पादंन रस्त्यावरचे काम अर्धवट सोडून दिल्याने,या गावातील शेतकऱ्यांनी नेर तहसील कार्यालयात येऊन तेथे उपलब्ध असलेल्या एस. डि.ओ.ला निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मुकिंदपूर ते गोडगव्हान मधील पाधनरस्ता हा अर्धवट सोडून दिल्यामुळे उरलेल्या अर्ध्या रस्त्यावर पाणी साचल्याने व जमिनीच्या काळयामातीमुळे तेथील संपूर्ण भाग हा दलदलीचा बनला आहे. या भागातून शेती उपयोगी लागणारे अवजारे ने आन केल्या जात नसल्याने त्या ठिकाणची आमची जमीन पडीत पडत आहे.आमच्या शेताला दुसरा रस्ताही नाही.असे दिलेल्या निवेदन उल्लेख आहे . निवेदन वाचल्यानंतर एसडिओ असे म्हणाले की, पादन रस्ता पुर्ण मंजूर असून तो पूर्ण केल्या नसेल तर त्यांना तो करायला लावू किंवा अर्धा रस्ता मंजूर असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून ते रस्ता पूर्ण करायला लावू असे मत व्यक्त केले. हे निवेदन नेर तहसीलचे नायब तहसीलदार इंगोले यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी तालेवानखाॅन वल्द सलाबतखाॅ, मो. आसिफ मो.हय़्याद, मो. ईमरान मो.हय़्याद, दिवाकर ढोके, मो. ईरफान मो.हय़्यात, मो. हमीद मो. हय़्यात, मो. रफीक मो.हय़्यात, जीवन शिंदे, गजानन शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश शिंदे, मोहम्मद हनीफ, ज्ञानेश्वर गुल्हाने, भालेराव, महादेव खडसे व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close