10 वि च्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जाळले

कर्नाटक / नवप्रहार न्यूज नेटवर्क
10 व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला तो सायकलने जात असताना त्याच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेला कारणीभूत ठरली ती मृतकाने एका आरोपीच्या अल्पवयीन बहिणीला हटकण्याची बाब. चार आरोपींपैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत. पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या मृत्यूपूर्व बायना नंतर पोलिसांनी 4 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.”
आरोपींमध्ये चारपैकी तीन जण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत पीडित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेश घडली असल्याची माहिती मिळाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यावर पेट्रोल शिंपडून पेटवून देण्यात आलं. शुक्रवारी पहाटे तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांनी पीडितेला आग लावल्याने दहावीतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी क्लाससाठी सायकलवरून जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील चार आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आरोपींनी मुलाला अडवलं आणि त्याच्यासोबत हा भयंकर प्रकार केला. आग लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पीडित मुलाचं नाव के यू अमरनाथ असल्याची माहिती मिळाली आहे. मृत्यूपूर्वी पीडितने आरोपींची नाव सांगितली आहे. त्यापैकी एक मजूर असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी व्यंकटेशची छोटी बहीण अल्पवयीन आहे. या बहिणीने गैरवर्तन केल्यानं पीडित तिला ओरडला. याच कारणातून व्यंकटेश आणि पीडित यांच्यात वाद झाले. या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहेत.
मुलाच्या पालकांनी नंतर वेंकटेश्वर आणि तीन अल्पवयीन मुलांवर आत्मदहनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिस तक्रार दाखल केली. चेरकुपल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि पाठलाग संबंधित कलमे जोडली. पोलिसांनी पॉक्सो कायद्याचाही वापर केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.