संत नागाजी महाराज समाज भवनाचा आज वास्तुपुजन व लोकार्पन सोहळा
वरूड/तूषार अकर्ते
वरूड शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या संत नगाजी महाराज समाज भवनाचे वास्तु पुजन व लोकार्पण सोहळा आज दि.१५ जुलै रोज शनिवारला संपन्न होत आहे.
संत नगाजी महाराज चॅरिटेब ट्रस्ट व वरुड नगर परिषदेच्या वतिने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे संत नगाजी महाराज चॅरीटेबल ट्रस्ट हि नाभिक समाज बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा, वर-वधू परिचय मेळावे,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा, आरोग्य शिबिरे, वृक्ष रोपन, रक्त दान शिबिर, बाल संस्कार शिबर अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट कडुन सतत करण्यात येते. सदरील कार्यक्रमाची दखल घेवुनच वरुड शहरा मध्ये संत नगाजी महाराज समाज भवनाची निर्मीती करण्यात आली आहे. सर्वधर्म सम भावनेच्या दुष्टीने संत नगाजी महाराज समाज भवनाचा लोकार्पण सोहळा आज दि. १५ जुलै रोज शनिवारला सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधिर उर्फे बंडू राऊत प्रदेश कार्यध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून वरूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रविण मानकर, तहसीलदार संतोष आष्टीकर,नायब तहसीलदार पंकज चव्हाण, ठानेदार अवतारसिंग चव्हाण, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, सह्हायक अभियंता स्वप्निल हेटे यांची प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे.
कार्यक्रमाचे आमंत्रित पाहुण्यांमध्ये कोहळे पाटील, विनोद डहाके, सदाशिव लिखितकर, संजय सोनारे, प्रभाकर काळे, प्रकाश कोहळे, मुन्ना तिवारी, महेन्द्र देशमुख, प्रशांत धुर्वे, संजय कानुगो, आकाश बेलसरे, लोकेश अग्रवाल, विनोद भोंगाडे, पराग तरार, वैभव श्रीखंडे, शेषराव श्रीराव, राहूल चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर फुलबांधे राष्ट्रीय अध्यक्ष, अंबादास पाटील माजी प्रदेश कार्यध्यक्ष, श्याम आस्कर प्रदेश उपाध्यक्ष, भाऊराव निभोरकर अध्यक्ष संत नगाजी महाराज ट्रस्ट, लक्ष्मण बाभुळकर, मोहन निभोरकर, रामकुष्णा शिरुळकर, सुमित निभोरकर, खुशाल नागपूरे रमेश निभोरकर, मुरलीधर आसोलकर, ज्ञानेश्वर डांगरकर, वर्षा तळखंडकर, श्रिमती निलिमा मांडवकर, उषा आंबुलकर, निलम सावरकर यांची प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे.तसेच प्राची विजय पांडे, शैली विनय शहा यांनी नुकतीच चार्टट अकाऊंटन परिक्षा पास केल्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सुष्टी दिवाकर नागपूरे, कुषी रत्न प्रविण कुंडलकर व वृक्ष मित्र राजु सिरस्कर यांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे.