सामाजिक
सांगळूदकर नगर चिखलमय ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
रस्त्यावर जागोजागी साचते पाण्याचे डबके
पालिका प्रशासनाचे पूर्णपणे
दुर्लक्ष
दर्यापूर प्रतिनिधी /सूरज देशमुख
शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ख्याती असलेल्या सांगळुदकर नगर मध्ये पावसाच्या सरी बरसताच येथे जागोजागी पाण्याचे डबके साचतात. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथील रहिवाश्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे
सांगळूदकर नगर वासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी विकास कामे झाली नसल्याने वार्डाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने पावसाच्या सरी आल्या तरी त्यात पाणी साचून डबके तयार होते. यामुळे वाहन धारक आणि पायी चालणाऱ्या लोकांना फार त्रास सहान करावा लागतो.
पाण्याचे डबके तयार झाल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जनेताच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वार्ड मेंबर चे पूर्णतः दुर्लक्ष – वार्डाचा विकास करण्याची जबाबदारी ही वार्ड मेंबर ची असते,. त्यांच्या वार्डात काय समस्या आहे आणि त्याचे निराकरण कसे करता येईल या कडे लक्ष देणे हे या ठिकाणच्या नगर सेवकाचे कर्तव्य असते .
नगर सेवकावर जबरदस्त नाराजी – मते मागताना नगर सेवक मतदारांचे वेळप्रसंगी पाय देखील पडतात.पण एकदा का निवडून आले की मग त्यांना त्याचा विसर पडतो . येणाऱ्या काळात या परिसरातील मतदारांनी नगर सेवकाला धडा शिकविण्याचा प्रण केला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1