संच मान्यता नवीन निकष शिक्षकांच्या जीवाला घोर- अतिरिक्त शिक्षक मिळविणे अवघड झाले
नागपूर / प्रतिनिधी
दिनांक 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संच मान्यतेचे नवीन निकष अमलात आलेले आहे हे निकष सन 2024 पासून 24-25 या शैक्षणिक वर्षापासून अमलात येतील याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
1. संचमान्यतेची संदर्भ तारीख 30 सप्टेंबर असणार
2. द्विशिक्षकी शाळांमध्ये 60 पटासाठी किमान दोन शिक्षक असणार मात्र तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान 16 मुलांची अधिकची आवश्यकता असणार आणि हे तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान 76 मुलांचे आवश्यकता असणार.
3. 1 ते 20 च्या पटसंख्येच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असणार तथापि एक नियमित शिक्षक आणि *दुसरा सेवानिवृत्त शिक्षक* अशी दोन पदे असणार
4. पटसंख्या दहापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक शिक्षक मान्य होणार आणि *तोही सेवानिवृत्त शिक्षकांमधून नेमणार* सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देणार
5. इयत्ता सहावी ते आठवी मध्ये एकच वर्ग असल्यास 35 पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे 53 पटानंतर नंतर दुसरा शिक्षक मान्य होणार. तिसरा शिक्षक मान्यवण्यासाठी किमान 88 पट लागणार.
6. . इयत्ता सहावी ते आठवी मध्ये दोन वर्ग असल्यास 70 पर्यंत दोन शिक्षक आणि त्यापुढे 88 पटानंतर नंतर तिसरा शिक्षक मान्य होणार. त्यानंतर शिक्षक मान्य करण्यासाठी प्रत्येकी 35 मागे 1 शिक्षक मिळणार.
7. इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन शिक्षक पात्र होण्यास किमान संख्येपेक्षा 18 विद्यार्थ्यांचा पट अधिक असावा लागणार.
8. मुख्याध्यापक पद पात्र होण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी /आठवी चा एकूण पट किमान 150 असावा लागणार मात्र जुन्या शाळेत पद संरक्षित करण्यासाठी 135 पट टिकवावा लागणार.
वरील निकष ही संच मान्यतेच्या शासन निर्णयामधील ठळक मुद्दे आहेत आणखी बऱ्याच अटी शर्थी त्यामध्ये आहे. तथापि वरील सर्व निकषांचा विचार केल्यास *सन 2024-25 पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण झटकेसरशी खाली येणार आहे* आणि ते प्रमाण टिकवणे देखील अवघड असणार आहे. तसेच नियमित एक शिक्षक शाळांचे प्रमाण वाढणार आहे.
मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या टिकणे हे एक यापुढे स्वप्नच असणार आहे, खरंतर आपल्या दृष्टीने ही एक धोक्याची घंटा आहे याबाबत जाणकारांनी आणि तज्ञ लोकांनी विचार करून यथा अवकाश का होईना पण योग्य मार्ग काढायला हवा.