सामाजिक
नांदेड नंतर नागपूर आयकर विभागाचा पहाटे अकोल्यात सुद्धा छापा; बड्या उद्योगपतींचे धाबे दणाणले
अकोला / प्रतिनिधी
नांदेड येथे आयकर विभागाने केलेल्या कारवाई नंतर आज नागपूर आयकर विभागाने पहाटे अकोल्यात सुद्धा छापा टाकला आहे. यामुळे बड्या उद्योगपतींचे धाबे दणाणले आहेत.अकोला शहरातील प्रसिद्ध अशोकराज आंगडीया सर्विसवर पहाटे छापा टाकण्यात आला आहे. या आंगडिया सर्विसचे संचालक निमेश ठक्कर असल्याचे समजते.सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठक्कर यांनी अनेक दिवाळखोर निघालेले कारखाने विकत घेतले आहे. आज अचानक मारण्यात आलेल्या छाप्यामुळे बड्या उद्योगपतींचे मात्र धाबे दणाणले आहेत. या कारवाईत नेमक काय आढळून आलं आहे, याची वृत्त लिहेस्तोवर माहिती मिळाली नसून आयकर विभागातर्फे कारवाई अद्यापही सुरूच आहे. अशोकराज आंगडीया सर्विसवर केलेल्या कारवाईचे नांदेड कनेक्शन असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात जोर धरू लागली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1