हटके

महिला रोज रात्री जायची स्मशानात हे होते कारण 

Spread the love

लखनऊ  / नवप्रहार डेस्क 

                     स्मशान  अशी जागा आहे जिथे दिवसा जायला देखील लोक घाबरतात. तर मग रात्री ऐकटे जाणे दूरच. महिलांना तर या ठिकाणी प्रवेश नसतो . अलीकडे काही समाजातील महिला याठिकाणी जातात तो भाग वेगळा. अश्यात ये महिला ऐकटी ती ही रात्रीच्या वेळेस स्मशानात जात असेल तर मग लोकांना संशय येणे आणि आश्चर्य वाटणे साहजिक आहे. लोकांना यामागील कारण जेव्हा समजले तेव्हा सर्वांना धक्का बसला. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे.

बदायूंमधील वजीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील सैदपूरमधील ही महिला. 4 मुलांची आई आहे. तिचा नवरा दिल्लीत राहतो. पण आपली बायको नेहमी स्मशानात जाते, पण का? यामागील कारण समजताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

या महिलेचे स्मशानभूमीत राहणाऱ्या बाबांसोबत संबंध होते. एक दिवस ती पती आणि चारही मुलांना सोडून पळून गेली. त्यानंतर कोर्ट मॅरेज केलं.

पती दिल्लीत मजुरीचं काम करायचा. नवऱ्याचा आरोप आहे की, बाबा अनेकदा त्याच्या घरी पत्नीला भेटायला यायचा. हे बरेच दिवस सुरू होतं. पुढे महिलेने आणि बाबाने कोर्ट मॅरेज केलं. हा प्रकार पतीला समजताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. गावातील लोकांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही मान्य करत नव्हती.

महिलेला मुलांचीही दया आली नाही

ती महिला आपल्या चार मुलांना पतीकडे सोडून बाबांसोबत गेली. निरागस मुले आईसमोर रडत राहिली पण प्रेमाने आंधळ्या झालेल्या क्रूर मातेला त्या निष्पाप मुलांची दया आली नाही.

सध्या पतीने वजीरगंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस आता तपास करत आहेत. आरोपी बाबाचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close