गोहत्येसाठी नेणाऱ्या गौमातांचा जीव वाचविल्या बद्दल शिव महापुराण कथेत समाजसेवक सुरज मेश्राम यांचा सत्कार
.धामणगांव रेल्वे -महाशिवरात्री निमित्य धामणगांव रे येथील वार्ड क्र.४ येथे पं.सुरज महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीतून शिव महापुराण कथा मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू आहे ,या कथा कार्यक्रमात समाजसेवक सुरज बाबुलालजी मेश्राम यांनी रात्री ३ च्या सुमारास गोहत्येसाठी गाई चोरून नेणा-या टोळीचा एकट्याने पाठलाग करून गौमातांचा जिव वाचवला,याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. जिवाची पर्वा न करता समाजसेवक सुरज मेश्राम यांनी एकट्याने गाई चोरणा-यांचा पिछा करून गौमातेला जिवनदान दिले हि गोष्ट साधी नसुन त्यासाठी माणसात हिंमत असणे गरजेचे आहे ते सामर्थ्य त्यांना शिवजींकडून मिळाले असुन महादेवांची त्यांच्यावर कृपा आहे असे प्रसिद्धकथावाचक पं.सुरज महाराज सत्कार करतांना म्हणाले.या अगोदरपण सुरज मेश्राम यांच्या समाज कार्याची दखल अनेक प्रसारमाध्यमांद्वारे घेतल्या गेलेली आहे.”महादेवाच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपेने मी समाजासाठी आणखी चांगले कार्य करत राहिल फक्त लोकांचा व माझ्या आई वडीलांचा आशिर्वाद कायम असाच सोबत असु द्या असे समाजसेवक सुरज बाबुलालजी मेश्राम यांनी सत्कार स्विकारतांना सांगितले.यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.