Uncategorized

साखरपुडा मोडल्याचा राग ,तरुणाने घरात शिरून केली तरुणीची हत्या 

Spread the love

सवाई माधोपूर (राजस्थान ) / नवप्रहार ब्युरो

            एखादी गोष्ट नागरिकांना सामान्य वाटत असली तरी ज्याच्या सोबत हा प्रकार घडतो तो त्या गोष्टीला कुठल्या दृष्टीकोनातून पाहतो हे संबंधितावर अवलंबून असते. आता लग्न जोडून ते तुटने हा प्रकार अनेक वेळा घडतो. पण सवाई माधोपूर येथील तरुणाला त्याचा साखरपुडा मोडल्याचा इतका राग आला की त्याने ज्या तरुणीने साखरपुडा मोडला तिची घरात घुसून हत्या केली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपीची सध्या चौकशी सुरु आहे. ही घटना राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव शहनाज असे आहे. शहनाजच्या घरात घुसून आरोपीने तिचा खून केला. आरोपी आणि शहनाजचे लग्न ठरले होते. पण साखरपुडा मोडला. दोघांमध्ये आधीच वाद सुरु होता. ही हत्या वैयक्तिक शत्रुत्वातून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि आसपासच्या लोकांची चौकशी करुन पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

दुपारी २ च्या सुमारास पोलिसांनी एका मुलीची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलाीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांना घरातील एका खोलीत बेडवर शहनाजचा मृतदेह आढळला. तिच्यावर गळा धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी शहनाजची आई रुग्णालयात, तर वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने शहनाजवर हल्ला केला.

आरोपी तरुणाने २२ वर्षीय शहनाजवर हल्ला केला. शारदार शस्त्राने आरोपीने शहनाजचा गळा चिरला. या हल्ल्यामध्ये शहनाजचा जीव गेला. हत्या केल्यानंतर आरोपी तरुण पळून गेला होता. पण पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले. लग्न मोडल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण त्यांचा साखरपुडा का मोडले यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close