Uncategorized

आरटीओ चे ऑनलाइन चालान पाहताच गाडी मालक चक्रावला

Spread the love
गाडी त्याची नाही पण नंबर एकच असल्याने झाला घोळ
 नोएडा / प्रतिनिधी

                       नोएडा येथील एक गाडी मालक आपल्या गाडी ने लग्नसमारंभाला गेला होता.तेथून  परतल्यावर त्याच्या मोबाईल वर आर्टीओच्या एम परिवहन ऍप वरून त्याला एक मॅसेज आला मॅसेज वाचून तो चक्रावला कारण त्याला ओव्हरपीड सलचे 2000 रु चे चालाण करण्यात आले होते. त्याने चालाण वरील गाडीचा फोटो पहिला असता त्याला धक्का बसला कारण ती गाडी त्याची नव्हतीच.याचाच अर्थ त्याची नंबर प्लेट अन्य  कोणी वापरत होता. ही बाब त्याच्या लक्षात आल्यावर त्याने पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

             ही गाडी कोणाची होती याबाबत माहिती समोर आलेली नसून कार मालकाने नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करत आहेत.

ज्या कारचे चलन काढले गेले ती त्याची कार नव्हती. सहा दिवसांसाठी ते झाशीला लग्नसमारंभाला गेले होते. चलन आल्यावर त्यांना आपल्य़ा कारच्या क्रमांकाची गाडी नोएडामध्ये फिरत असल्याचे समजले. यमुना एक्स्प्रेवेवर ओव्हरस्पीडमध्ये ही कार धावत होती. या कारचे फोटो स्पीड कॅमेराने टिपले आहेत. आपल्या गाडीचा नंबर वापरून काही गैरकृत्य तर केले जात नाहीय ना अशी भीती या मालकाला सतावत आहे.

अभिषेक असे या कारमालकाचे नाव आहे. त्याने २००० रुपयांचे आलेले चलन पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी त्याची कागदपत्रे पडताळली आहेत. याची चौकशी करून चुकीचे आढळले तर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोल्हापूर मध्ये मुंबईच्या गाडीचा नंबर लावून वाहतुकीचे नियम मोडल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. असाच प्रकार नोएडामध्येही समोर येत आहे. गाडी मालक कार घेऊन गावी लग्नसमारंभाला गेलो होता, शहरात येताच त्याला ओव्हरस्पीडचा मेसेज आला, उघडून पाहिले तर एकाच नंबरच्या दोन गाड्या पाहून धक्का बसल्याचा प्रकार घडला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close