रिध्दपुर ग्रामपंचयत सार्वत्रिक निवडणूक चे पार्श्वभूमीवर शिरखेड पोलीसची अवैध धद्यांविरुध्द धडक मोहीम”

मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील रिद्धपुर, गोराळा, ब्रह्मनवाडा दिवे येथे दिनांक 5/11/2023 रोजी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे पार्श्वभूमीवर शिरखेड पोलिसांनी अवैध धंदे व फरार आरोपी विरुद्ध धडक कारवाई केली. ज्यामध्ये रिद्धपूर येथे अवैध दारू विकणारे घनश्याम रमेश हरणे, मुक्तार हुसेन अशपाक हुसेन, अंबादास श्रीराव, गवांदे, नीलेश वानखेडे विरुध्द 5 दारुबंदी केसेस करून 12220/-रू चा मुद्देमाल जप्त केला. अवैध गुटखा विक्री करणारे मोहम्मद सोहेल अमन अब्दुल, मोहम्मद जमीर मोहम्मद सलील विरुध्द 2 केसेस करून 10440/- रू चा शासन प्रतीबंधित गुटखा जप्त केला. शरीराविरुद्ध मारामारीचे गुन्हे करणारे, सार्वजानिक उत्सवात दारू पिऊन धांदल करनारे नॉन बेलेबल पकड वारांटमधील 15 आरोपींना अटक करून मा. कोर्ट मोर्शी येथे पेश केले असता 5 आरोपींना कोर्ट ने जेल मध्ये पाठवले. अवैध रेती विक्री करणारे बाबलेश बापूराव पोहाकर रा उडखेड, सोमनाथ अडकित्ता धूर्वे, लोकेश गोमकाले विरुध्द गुन्हे दाखल करून गुन्ह्यात टाटा सुमो, ट्रॅक्टर व रेती असा एकुन 4,57,000/- रू च मुद्देमाल जप्त केला. सराईत गुन्हेगारांना कलम 144(2) फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे निवडणूक असलेल्या रिद्धपूर गावातून मा. एस डी एम साहेब मोर्शी यांनी हद्दपार केले. रिद्धपूर लगत चांदूरबाजार तालुक्यात असलेले बार अँड रेस्टॉरंट कलम 142 (2) मुंबई दारू बंदी कायदा प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवणे बाबतचे आदेश जारी करण्यात आले. रिद्धपूर गावात सतत पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करून मोर्शी, तिवसा, चांदूरबाजार जाणारे रोडवर कडकर नाकाबंदी करीत आहेत. निवडणुक चे आदले दिवशी व निवडणुक चे दिवशी रिद्धपुर गावात मोठ्या प्रमाणत बंदोबस्त तैनात राहणार आहे. सर्व मतदार यांनी निडणुक प्रक्रियेत सहभाग नोंदवून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाकडून केल्या जात आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एस डी पी ओ मोर्शी डॉ. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुरज तेलगोटे, सपोनि अनुप वाकडे, राहूल गवई, प्रमोद खरबडे, बिट अंमलदार संजय वाघमारे,नितेश वाघ, संतोष पवार, शकुर शेख, राजीक खान, वैभव घोगरे, अमित राऊत, गजानन तिजारे यांनी केली.