राजकिय

काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे वर्धा लोकसभेतून  तुतारी चिन्हावर भाग्य आजमावणार 

Spread the love

भाजपला रोखण्यासाठी आपली उमेदवारी असल्याची अमर काळे यांची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या सभेसाठी गेलो आणि तुतारी घेऊन परत आलो

वर्धा  / आशिष इझनकर

– वर्धा लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून आपल्याला मिळाली याबाबत माजी आमदार अमर काळे यांनी दुजोरा दिला असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी आपण हाती घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. येथे पोहचल्यावर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी माध्यमांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपण काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या संमतीने प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरीही मनाने मात्र आपण काँग्रेसचे आहोत. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला शह देण्यासाठी आपण रिंगणात उतरलो आहोत. सध्या ही यादी संभाव्य यादी आहे, पण मी काँग्रेस पक्षाच्या संमतीने तुतारी चिन्हावर लढण्यासाठी सज्ज झालो आहे. इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढविणार आहे. देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी आपले लोकसभा हे टार्गेट आहे. माझं नाव कन्फर्म झाले आहे फक्त ऑफिशियल घोषणा केवळ व्हायची आहे. शरद पवार यांच्यासोबत लोकसभा याच विषयावर चर्चा झाली. तुतारी चिन्हावर लढण्यास आता कार्यकर्ते देखील आग्रही आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या सभेसाठी मुंबईला गेलो आणि तुतारी घेऊन परत आलो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close