रोहित्राची दुरावस्था ; विद्युत विभागाचे दुर्लक्ष
आष्टी शहीद (वर्धा ) :
नजीकच असलेल्या लहान आर्वी येथील महात्मा फुले उरकुडे ले आऊट मध्ये असलेली डीपी (रोहीत्र) गेल्या तीन चार महीण्यांपासुन कोसळण्याच्या स्थितीत आहे.परंतु महावितरण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते आहे.लहान आर्वी येथील ग्रामपंचायत कक्षेतील महात्मा फुले उरकुडे ले आऊट मध्ये १९ घरांची वस्ती नव्याने निर्माण झाली आहे.त्यामुळे येथे नव्याने काही वर्षांपुर्वी नवीन डीपी (रोहीत्र) निर्माण करण्यात आले.परंतु काही वर्षांपूर्वीच निर्माण केलेले डीपी (रोहीत्र) कोसळण्याच्या स्थितीत आल्यामुळे महावितरण विभागाचे कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.ही डीपी (रोहीत्र) वस्तीत असल्याने तेथे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी लहान आर्वी ग्रामपंचायतचे सदस्य सागर नागापुरे यांनी भेट देऊन डीपी (रोहीत्रा)ची पाहणी केली आणि स्थानिक पत्रकारास घटनास्थळी बोलावुन या बाबतीत माहिती दिली.या अनुषंगाने अंतोरा येथील कनिष्ठ अभियंता विवेक वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही असे सागर नागापुरे यांनी प्रतीनिधी जवळ सांगितले. सदर डीपी (रोहीत्र) हे वस्तीत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे महावितरण विभागाने तातडीने डीपी (रोहीत्र) चे काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.