शेती विषयक

कांदा,तुर,हरभरा पिकावर केसाळ व घाटे अळीचा प्रादुर्भाव  अंजनगाव तालुक्यातील शेतकरी संकटात

Spread the love

 

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

अंजनगाव तालुक्यातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर पाने खाणाऱ्या हिरव्या घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला असून, कांद्याच्या रोपा सह तुर पिकावर मोठ्या प्रमाणात अळीने अट्याक केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक कीटकनाशकांची फवारे करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
अंजनगाव तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरणी लावलीनंतर कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले. आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळे
उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे. आता हे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
हरभरा,तुर , कांद्याच्या रोपा सह इतर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीक धोक्यात आले असून, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. उरली सुरली पिके परतीच्या पावसाने वाया गेली. अशा स्थितीत शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून असून, वातावरणातील बदलांचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात केसाळ ,व घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला असला तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

*बाॅक्स*

कांदा पिकावर सध्या अंजनगाव सूर्जी भागात स्पोडोप्टेरा अळीचा उद्रेक असल्याच्या तक्रारी आहेत .ही अळी कण्याचिकपणे तसेच मुळे खाऊन कांडपिकाचे नुकसान करते या वातावरणात झपाट्याने वाढ होते तरी शेतकरी बांधवांनी त्वरित chlorpyriphos 50 %+Cypermethrin 5% EC मिश्र कीटक नाशक @ 20 मिली किंवा Profenophos 40 %+ Cypermethrin 4 % मिश्र कीटक नाशक @. 20 मिली किंवा flunbendamide 8.33 %+ deltamethrin 5.56 % EC @5 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करण्याचे आवाहन डॉ.अनिल ठाकरे सेवानिवृत्त कीटक शास्त्रज्ञ अमरावती यांनी केले आहे .

*प्रतिक्रिया*

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आव्हान

या वातावरणात अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे त्यांनी तशी तक्रार पिक विमा कंपनी कडे करावी तसेच या अळीवर नियंत्रित करण्यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन फवारणी करावी जेणेकरून अळीचा प्रादुर्भाव कमी होईल
राजाभाऊ तराळे
तालुका कृषी अधिकारी

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close