उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक
भंडारा( प्रतिनिधी) उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक उपविभागीय अधिकारी इंगोले यांच्या अध्यक्षतेतील घेण्यात आली उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती साकोली, लाखनी आणि लाखांदूर तीन तालुक्यामधून उपविभागीय दक्षता वनियंत्रण समिती तयार करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी साकोली, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, तहसीलदार साकोली, तहसीलदार लाखनी, गटविकास अधिकारी साकोली असे शासकीय तर अशासकीय सदस्य म्हणून मिळून उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती तयार करण्यात आलेली आहे या समितीच्या माध्यमातून शासनाच्या पत्रकार केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांची अधिसूचना दिनांक 8 नोव्हेंबर 2013 अनन्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करून दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार संदर्भ पत्र क्रमांक 2 दिनांक 31.10.2023 ला उपविभागीय अधिकारी साकोली यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली व त्या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीवर अन्याय झालेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रकरण साकोली लाखनी आणि लाखांदूर मध्ये घडलेले आहेत त्या संदर्भात विचार विनिमय झाला व त्यांना मदत कशी लवकरात लवकर मिळवून देता येईल आणि कोणत्या प्रकरण प्रलंबित आहेत त्यांच्या आढावा घेण्यात आला प्रकरण याविषयी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीमध्ये चर्चा करण्यात आली
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी इंगोले उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी पवनी, तहसीलदार साकोली ,गटविकास अधिकारी साकोली अशासकीय सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी ,सुशील गणवीर, चंदा कांबळे ,करुणा वालदे, भाऊराव कुंबरे व इतरही सदस्य समितीला बैठकीमध्ये आढावा बैठकीत उपस्थित होते