क्राइम

विवस्त्र करून आणि हातपाय बांधून मारहाण केल्याने व्यक्तीचा मृत्यू 

Spread the love

विशेष प्रतिनिधी /  यवतमाळ

         एका ४० वर्षीय व्यक्तीस विवस्त्र करून आई हातपाय बांधून मारहाण केल्याने अंतर्गत ईजा पोहचल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.मृतकाचे नाव सखाराम हुलकाने (४०) ते आहे. घटना जिल्ह्यातील पुसद पोलिस स्टेशन च्या हद्दीत काकडदाती येथे घडली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संबंधित व्यक्तीला अर्धमेल्या अवस्थेत फेकून दिलं होतं. संबंधित व्यक्तीचा आता उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना काय?

ही घटना पुसद पोलीकडे काकडदाती परिसरात घडली. सखाराम हुलकाने असं हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते श्रीरामपूर .येथील रहिवासी होते. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ शिवानंद हुलकाने यांनी पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.तक्रारीत काय म्हटलं?

शिवानंद हुलकाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या वेळी शिवानंद यांना कळालं की काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ काही जण सखाराम यांना मारहाण करत आहेत. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा सखाराम यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना रस्त्यावर टाकण्यात आले होते. यावेळी आरोपी विठ्ठल नागोराव भाकरे, रोहन भाकरे, प्रशांतकुमार उर्फ पवन भाकरे (सर्व राहणार काकडदाती) आणि योगेश उत्तम भाकरे हे घटनास्थळी उपस्थित होते.

विठ्ठल भाकरे हा पाईप तसेच लाथा-बुक्क्यांनी सखाराम यांना बेदम मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर जखमी सखाराम यांना घरी नेण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले. मात्र विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ९:३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.चारही आरोपींना अटक

दरम्यान, पुसद शहर डीबी पथकाने तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि गोपाल इंद्राळे व त्यांचे पथक करीत असून, या अमानुष मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close