विभाजन विभीषिका स्मृतिदिन बैठक संपन्न
(अंजनगाव सुर्जी) मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील शासकीय विश्रामगृह येथे भाजपा द्वारे विभाजन विभीषिका स्मृतिदिन बैठक दर्यापूर विधानसभेचे माजी आमदार रमेशजी बुंदीले यांच्या मार्गदर्शनात विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
अखंड भारत देशात झालेल्या दंगलीत जनतेने बलिदान दिले आणि नागरिकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली.त्यामुळे देशावर कोसळलेल्या या संकटाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट रोजी फाळणी दिन म्हणजेच विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांनी पाळावा करिता या बैठकी दरम्यान भाजपा प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार रमेश बुंदीले,विधानसभा प्रमुख गोपाल चंदन,मदनराव बायस्कर,ॲड.कमलकांत लाडोळे,डॉ.विलास कविटकर,ॲड.पद्माकर सांगोळे,सौ.प्रियंकाताई मालठाने,संयोजक मनीष मेन,अतुल गोळे मनोज श्रीवास्तव यांच्या समवेत विद्याताई घडेकार,शुभांगीताई पाटणकर,राजेंद्र रेखाते,संदीप राठी,विनोद दुर्गे सर,रतन भास्कर,राजेश बांगर,राम सोळंके,हर्षल पायघन,मिलिंद गोतमारे आदी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.