क्राइम

पतीने ही मुलं माझी नाहीत असे म्हणताच तिने उचलले टोकाचे पाऊल

Spread the love

जम्मू कश्मीर / नवप्रहार डेस्क

               एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. ती मुलांच्या जन्माने आनंदात असतांनाच सौदी अरेबियात रहात असलेल्या तिच्या पतीने ही मुलं आपली नाहीत असे म्हणताच तिने दोन मुलांची गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. घटना जम्मूकश्मीर मधील पुच्छ जिल्ह्यांत घडली आहे. या घटनेनंतर सगळेच हादरले असून, दुसरीकडे शोककळाही पसरली आहे.

महिलेचा पती सौदी अरेबियात कामाला आहे. तीन महिन्यांपूर्वी तो घऱी परतला होता. बऱ्याच काळानंतर तो घरी आला होता. दरम्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. ही मुलं आपली नसून पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आल्याचा दावा त्याने केला. यानंतर महिला घाबरली होती. तिने जुळ्या मुलांना जवळच्या शेतात नेलं आणि तिथेच त्यांना ठार केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवजात मुलांची हत्या झाल्यानंतर स्थानिकांना यामध्ये पतीचाच हात असावा अशी शंका होता. पण पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पूँछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक योगुल मन्हास यांनी सांगितलं आहे की, “आईनेच तिच्या जुळ्या मुलींची हत्या केली. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे”.

या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिकांनी महिलेला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने आपल्या नवजात मुलींना ठार मारून शहराच्या सुलतानपुरी भागात त्याच्या घराजवळ पुरल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. 32 वर्षीय वडील मुलासाठी हताश होते. याच नैराश्यातून त्याने हे कृत्य केलं होतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close