निर्माणाधीन नाट्यगृहात तांत्रिक बदल करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन
रंगमंच अध्यावत करण्याची मागणी, अनेक कलावंतांची उपस्थिती
नेर:-नवनाथ दरोई
महाराष्ट्र राज्यांचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने नेर शहरात 18 कोटी खर्च करून भव्य-दिव्य असे नाट्यगृह व सभागृह आकारास येत आहे. परंतु कलावंतानी या नाट्यगृहाची पाहणी केली असता यामध्ये झालेल्या बांधकामामधील प्रस्तावित रंगमंचामध्ये तांत्रिक आणि स्थापत्य अडचणी व समस्या दिसुन आली.कलावंताच्या नाटय प्रस्तुतीच्या वेळी हा रंगमंच अडचनिचा ठरु शकते,त्यामुळे रंगमंचाची रुंदी हे दोन ते तीन मीटर वाढवावी, समोर एक लाईट बाॅटम प्रकाश योजनेसाठी अद्यावत असावे, रंगमंचाच्या बाजूला असलेले विंग्स हे सहज सरकवता येता यावी त्यामुळे रंगमंच हा कमी जास्त करता ये तो, शेवटी वारण्यात येणाऱ्या पडदया आधी गगणीका यांचा वापर करण्यात यावा. या यांत्रिक बाबतीचे निवेदन नेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी बापूराव रंगारी, राहुल हळदे, नवनाथ दरोई, नामदेव गवाले, ज्ञानेश्वर सोनटक्के, संदीप मिसळे, बाशित खान, बंडू बोरकर व अन्य कलावंत उपस्थित होते.