क्राइम

पत्नीवर परपुरुषा सोबत सबंध ठेवण्यास दबाव , पत्नीने नकार देताच केले असे 

Spread the love

बंगळुरू  / नवप्रहार डेस्क 

                     ज्या पतीवर पत्नीची अन्य व्यक्ती पासून होणाऱ्या अत्याचारातून सुटका करण्याची जबाबदारी असते. तोच पती जर पत्नीला परपुरूषा सोबत सबंध ठेवायला सांगत असेल तर मग पत्नीने कुठे जावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी घटना कर्नाटक च्या यादगिर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात  घडली.

पतीने आपल्याकडून मूल होत नसल्याने पत्नीला परपुरुषासोबत संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, पत्नीने या अशाप्रकाराला नकार देताच संतापलेल्या पतीने तिची गळा दाबून हत्या केली.

शरणा बसम्मा (वय 25) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नुकतीच अटक केली आहे. या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका 32 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

बसम्मा दाम्पत्य गंगनाला गावातील शरणा बसम्मा यांच्या घरी गेले होते. जेवण झाल्यावर दोघे झोपायला घराच्या पहिल्या मजल्यावर गेले. यावेळी भीमण्णाने आपल्या पत्नीला इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले जेणेकरून त्यांना मूल होऊ शकेल. यानंतर भीमण्णाची पत्नी शरणा संतापली. तिने संबंध ठेवण्यास नकार दिला. इतकेच नाहीतर तिने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगणार असल्याचे म्हटले.

पत्नीने नकार देताच पतीचा चढला पारा

पत्नीने नकार देताच पती चांगलाच संतापला. त्यानंतर या दोघांमध्ये वादही झाले होते. यानंतर पती भीमण्णा याने पत्नीचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने शरणा काहीच बोलत नसल्याचे तसेच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसत असल्याचे सांगितले.

डॉक्टरांना आला संशय, पोलिसांना लगेच माहिती

शरणा हिची हालचाल थांबल्याने सासरच्यांना फोन करून महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र, शरणा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून पोलिसांना सांगण्यात आले.

रिपोर्ट येताच उलगडले हत्येचे गूढ

संशयास्पद मृत्यू झाल्याचे कळल्यानंतरही महिलेच्या आई-वडिलांनी भीमाण्णा निर्दोष असल्याचे मानले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नाही. मात्र, सीएफएसएलचा अहवाल समोर येताच संपूर्ण गूढ उलगडले आणि आरोपीला अटक करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close