क्राइम

ब्लॅकमेल करुन पैशे उकळणाऱ्या महिला आणि साथीदारांविरोधात खंडणी सह अन्य गुन्ह्याची नोंद 

Spread the love

अमरावती / नवप्रहार मीडिया

                    महिलेकडून एका व्यक्तीला ब्लॅकमेल करत त्याच्या कडून 12 . 60 लाख उकळल्याची आणि त्याचे पर्स व त्यातील आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर साहित्य घेऊन पळून गेल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे. फिर्यादीच्या तक्रारी वरून महिला आणि तिच्या नातेवाईकांविरोधात खंडणी सह इतर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

काय आहे प्रकार: तक्रारीनुसार, फिर्यादी ओंकार नामक व्यक्तीची आरोपी महिलेसोबत एक वर्षापूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना भेटत होते. ती फिर्यादी यांच्या कार्यालयात येत होती. आरोपी महिलेने वेळोवेळी फिर्यादी ओंकार यांना पैशाची मागणी केली. दिले नाही तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देते, अशी धमकी दिली. त्यामुळे तिने यापूर्वी त्यांच्याकडून पाच लाख रुपये तसेच वेळोवेळी एकूण 12 लाख 60 हजार रुपये उकळले. दरम्यान, महिलेने ओंकार यांना पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली होती. नाहीतर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देते, अशी धमकी दिली.

स्टॅम्प पेपर फाडला: दरम्यान, फिर्यादीला तो ससेमिरा कायमचा टाळायचा होता. त्यामुळे दोन लाख रुपये घे व स्टॅम्पवर सही करून दे, यानंतर मला ब्लॅकमेल करू नको, असे ओंकार यांनी तिला बजावले. दरम्यान, ओंकारने 2 लाख रुपये व स्टॅम्प पेपर घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी गेले. त्यावेळी महिला आरोपीने स्टॅम्प पेपर फाडला. तसेच ओंकार यांच्या दुचाकीच्या डिकीतील दोन लाख रुपये, 9500 रुपये रोख असलेले वॉलेट, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, अशी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन ती पसार झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close