बलात्कार आणि खुनाच्या आरोपात दोषी प्रोड्युसरला 128 वर्षाची शिक्षा

सिनेजगतात एकदा स्थान मिळाले की प्रसिद्धी आणि पैसा पायाशी लोळण घेतात. याच कारणामुळे अनेक तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. हेच नव्या दमाचे कलाकार चित्रपटांत संधी मिळावी म्हणून शक्य असेल ते सर्व प्रयत्न करताना दिसतात.
मात्र नाव कमवण्याच्या प्रयत्नांत कधीकधी त्यांच्याशी मोठा दगाफटकाही होतो. विशेष म्हणजे सिनेजगतात अगोदरपासून वावरत असलेल्या काही व्यक्ती अशा नवख्या तरुण-तरुणींचा फायदा घेण्यासाठी टपूनच बसलेले असतात. मोठा ब्रेक देण्याचे प्रलोभन देऊन अनेकजण तरुणींची फसवणूक करतात. हॉलिवुडमधील असाच एक हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात समील असलेल्या व्यक्तीला बलात्कार, खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं असून त्याला तब्बल 128 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
7 महिलांवर ड्रग्ज देऊन बलात्कार
हॉलिवुडमध्ये प्रोड्यूसर असलेल्या डेव्हिड पियर्स याला दोन मॉडेल्सचा खून तसेच सात मॉडेल्सच्या बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं आहे. लॉस एंजेलिसच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने मॉडल क्रिस्टी जाईल्स आणि तिची मैत्रीण हिल्डा मार्सेला केब्रालेस अर्ज़ोला यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. सोबतच प्रोड्यूसर डेव्हिड पियर याच्यावर 7 महिलांचा बलात्कार केल्याचाही आरोप होता. यातही त्याला दोषी ठरवण्यात आलंय. डेव्हिड पियर्स याने 2021 साली अर्जोला आणि जाईल्स यांना ड्रग्जचा ओव्हरडोस देऊन त्यांची हत्या केली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार 42 वर्षांच्या पियर्स याच्यावर क्रिस्टी (24) आणि हिल्डा (26) यांच्या हत्येचा आरोप होता. पियर्सची किस्टी आणि हिल्डा यांच्याशी एका पार्टीत भेट झाली होती. या भेटीत मी हॉलिवुडमधील मोठा प्रोड्युसर असल्याचं या तरुणींना सांगितलं. त्यानंतर दिशाभूल करून त्याने या तरुणींना अपार्टमेंटवर बोलावलं होतं. अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर त्याने या तरुणींना ड्रग्जचा ओव्हरडोस दिला होता. परिणामी या तरुणी बेशुद्ध झाल्या होत्या. पुढे त्यांची हत्या करण्यात आली. हत्या करून पिटर्सने त्याचा रुममेट ब्रांट ऑसबॉर्न याच्या मदतीने तरुणींचे मृतदेह कारमध्ये ठेवून नंतर रस्त्याच्या बाजूला फेकून दिले होते.
होऊ शकते 128 वर्षांची शिक्षा
हा प्रकार समोर आल्यानंतर 2021-22 साली अन्य सात महिला पुढे आल्या होत्या. या सात महिलांनी पियर्सने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. हॉलिवुडच्या चित्रपटात काम देतो, असे प्रलोभन देत पियर्सने हा अत्याचार केला होता. या सात महिलांनादेखील अमली पदर्थ देऊन पियर्सने त्यांच्यावर अत्याचार केला होता. दरम्यान, याच प्रकरणात न्यायालयाने पियर्सला दोषी ठरवलंय. आता त्याला या गुन्ह्यांत साधारण 128 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
: