अतीपावसामूळे ओला दुष्काळ जाहीर करा, तहसिलदार मार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्या कडे मागणी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी पावसाने संपूर्ण आर्थिक संकटात सापडला आहे.अतीपावसामूळे नाले,नदीचे पाणी शिरल्याणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या.शेतात पाणी साचले पेरलेल्या पिकाचा पत्ताच नाही यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक वर्षच खराब होणार आहे मात्र अजूनही कृषी आणि महसूल विभाग केवळ नदी,नाल्याच्या पंचनाम्यात अडकले आहेत या गंभीर बाबीवर तालुक्यातील शेतकरी तहसीलदार निवेदन द्यायला गेले, मात्र शेतकरी पुरामुळे हवालदिल असताना तहसीलदार व निवेदन कर्ते शेतकरी यांच्यात निवेदनातील मुद्दे बाबत मतभेद झाल्या कारणाने थोडाकाळ तनाव निर्माण झाला.तहसिलदार यांनी शेतकऱ्यांची कोणतीही बाजू न ऐकता उद्धट पणे शेतकऱ्या सोबत वागणूक दिली हे अतिशय निंदनीय असून निवेदन कर्ते शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचा निषेधही व्यक्त केला. शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून झालेल्या नुकसानीचे,प्रती हेक्टर 50000, रूपये द्यावे,एकीकडे तालुक्यात 65 मिलीमीटर पेक्षा पाऊस झाला असताना प्रशासन कुणाच्या आदेशाची वाट बघत आहे हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांना या वेळी मानसिक आणि आर्थिक आधाराची गरज आहे.तरी हा विषय प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा तात्काळ सरसकट पंचनाम्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन घाटंजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.यावेळी निवेदन देतांना शेतकरी नेते मोरेश्वर वातीले,डॉ विजय कडू,शालिकराव चवरडोल,बंडू पाटील बोबडे,मधुकर निस्ताने,डॉ अरविंद तुरक,सय्यद रफिकबाबु अरविंद चौधरी,मनोज ढगले,कज्जुम कुरेशी,प्रशांत मस्के,बंडु तोडसाम,अनंत चौधरी,आशिष भोयर,राहूल अंजिकर,अरविंद जाधव,सुनिल हुड,अंकीत भोयर,आशिष आडे,सचिन कर्णेवार,विलास कठाणे,मनोज राठोड,राजु राठोड, संदिप ढालवाले,विष्णू कोवे,संजय ढगले,संजय गोडे,महेश पवार,शेख जमिल शेख करीम,दत्ताजी गतलेवार, आशिष परचाके, सागर डंभारे, विलास राठोड, रमेश पवार, सुधाकर अक्कलवार, सुधाकर पांगुळ,सज्जनराव चवरडोल, मधुकर सातपुते,अमृत करमनकर,संजय पेंदोर ज्ञानेश्वर टिपले,सह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.