आरोपीच्या घरात मिळाले १६ कोटी रोख व १२ किलो सोन्याचे बिस्कीट व २९४ किलो चांदी
ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून गोंदियातील तरुणाने फिर्यादीची ५८ कोटी ४२ लाखाने फसवणुक केल्याचे प्रकरण…
राजू आगलावे( जि.प्र.)
नव प्रहार/भंडारा
भंडारा-ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरातील उद्योगपतीच्या मुलाची गोंदिया येथील तरुणाने ५८ कोटी ४२ लाखाने फसवणूक केली असून, गोंदियातील आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरात नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने,गोंदिया क्राईम ब्रांच सोबत जैन यांच्या घरांवर संयुक्तपणे धाड टाकत १६ कोटीची रोख रक्कम आणि १२ किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीट व २९४ किलो चांदी जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
माहीतीनुसार गोंदिया शहरातील काका चौक येथे राहणारे, अंनत नवरतन जैन यांचे गोंदिया शहरातील मुख्य बाजार पेठेत कापडाचे दुकान आहे. मात्र कापड व्यवसायाच्या आड अनंत हा ऑनलाईन गेमिंग खेळवत असून, नागपुरातील एका प्रसिद्ध व्यपाऱ्याचा मुलगा हा ऑनलाईन गेम खेळताना; गोंदियातील अंनत जैन यांच्या संपर्कात आला. दरम्यान अनंत ने त्यांची २०२१ ते २०२३ या काळात ५८ कोटी ४२ लक्ष रुपयाची फसवणूक झाल्यानंतर फिर्यादीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता, सदर प्रकार समोर आला.त्यानंतर फिर्यादीने नागपूर पोलिसांकडे अनंत जैन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेवून आरोपीविरुद्ध विविध भांदवि कलमान्वये गुन्हे दाखल करुन,प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता, सदर धाड टाकुन कार्यवाही करीत आरोपीच्या घरातुन पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असुन,पोलिस अंनत जैन यांच्या संपत्तीची माहिती घेत आहेत. तसेच आरोपी फरार झाल्याने पोलिस पथक आरोपीचा शोध घेत आहेत.