दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूट नागपूर येथे रामचरितमानस मराठी ग्रंथाचे तिसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात थाटात प्रकाशन नुकताच संपन्न

मोर्शी (तालुका प्रतिनिधी)दि.16/5
बालाजी सरोज भाव काव्य मराठी साहित्य प्रतिष्ठान नागपूर यांच्यावतीने
तिसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपूर येथील माजी खासदार दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वरुड येथील साहित्य तथा यशवंत चित्रपटाचे, कथा पटकथा संवाद लेखक प्रा. अजय देशपांडे, प्रमुख अतिथी म्हणून कांचनताई गडकरी, ऍडव्होकेट लखन सिंह कटरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ना.गो. थोटे, नामांकित शेप विष्णू मनोहर व मोर्शी येथील साहित्यिक रमेश रावणगावकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मंचकावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
तुळशीदास द्वारा लिखित रामचरितमानस हे रामायण काव्य मगधी भाषेत लिहिले असून त्यातील दोहे हे संस्कृत भाषेत आहे. मग ती भाषा ही वाचण्यास व समजण्यास कठीण असल्याने साहित्यिक रमेश रावणगावकर यांनी त्याचे मूळ भाव मराठीत अनुवादन केले होते. या रामायण आठ कांड असून सदर पुस्तकाचे प्रकाशक ज्ञानसूर्य प्रकाशन पुणे यांच्या तयार करण्यात आले होते. सदर पुस्तकाचे नागपूर येथे तिसरे मराठी साहित्य संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन पार पडले होते. यावेळी साहित्यिक रावणगावकर यांचा सपत्नीक स्मृतिचिन्ह व गौरव पत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर आकाशवाणीचे निवेदक रत्नाकर मुळीक यांनी केले. प्रास्ताविक संमेलनध्यक्ष आयोजिका सरोज अंदनकर हिने केले तर आभार प्रदर्शन सोनाली देशमुख हिने केले. यावेळी राज्यभरातील साहित्यिक मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.