डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख उत्सवा निमित्ताने रॅलीचे आयोजन, श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्वलंत प्रश्नावर केले नृत्य सादर,कलावंत मयूर काळे यांचे दिग्दर्शन, प्रेक्षकांनी केले विद्यार्थीचे कौतुक

नेर:- नवनाथ दरोई
भाऊसाहेब देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रात व विशेषता शिक्षण क्षेत्रात भाऊसाहेबांनी त्या काळी शिक्षण संस्था निर्मान केल्या. जागतिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन करुन शेतकरी जिवनात क्रांती घडवली त्यामुळे खऱ्या अर्थाने आधुनिक शेतीचे जनक आहे.नेर येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षणमहर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या 25 व्या जयंती उत्सवाच्या व स्नेह मिलनाच्या अध्यक्षस्थानी मधुकर बोबडे हे मंचावर विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप खेडकर, पद्माकर गावंडे,बाबू पाटील जैत, श्री शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक मोहन मडावी उपस्थित होते. उद्घाटना नंतर यवतमाळ अमरावती महामार्गावरून तसेच नेर शहरातील मुख्य भागातून छत्रपती शिवाजी महाराजांचे व भाऊसाहेबांचे बॅनर ट्रॅक्टर वर लावून मिरूणूक काढण्यात आली.मिरवणुकीत यामध्ये कलावंत मयूर काळे यांनी दिग्दर्शक केलेले व संदीप मिसळे यांनी संगीत दिलेल्या,डॉ. शांतरंक्षीत गावंडे यांच्या निवेदनात शिक्षणाचे महत्त्व, पाणी वाचवा, मुली वाचवा, वृक्षतोड थांबवा, ग्राम स्वच्छता व भाऊसाहेबांचे अभिवादनाचे अनेक दृश्य साकारली होते. विद्यार्थ्यांनी साकारले नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.