सामाजिक
मूनलाईट काॅलनी बायपास येथे रमाई जयंती साजरी
प्रमिला मोहोड यांचे रमाई एकपात्री प्रयोगांत श्रोत्यांचे डोळे पाणावले.
कारंजा / शहर प्रतिनिधी
माता रमाई आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त मूनलाईट काॅलनी ओपनपेस बायपास येथे अभिवादन कार्यक्रम विशाखा महिला संघाव्दारे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमती पंचफुला अंभोरे व प्रमुख अतिथी म्हनुण आयु.अर्चना राऊत मॅडम व आयु.सोनोने मॅडम उपस्थित होत्या .
या कार्यक्रमात आयु.मोहोड यानी रमाई ही एकपात्री नाटिका सादर केली.या कार्यक्रमात मोहोड यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगात उपस्थित श्रोत्यांचे डोळ्यात अश्रू आलेत त्यांनी उपस्थित समोर रमाई चा जीवन संघर्ष मांडला कार्यक्रमास माजी वनधिकारी सिध्दार्थ देवरे आयु.बंडुभाऊ इंगोले यानी सभेस उद्बोधीत केले.
कार्यक्रमाचे संचालन आयु.शालीनी मनवर मॅडम यानी केले तर आभार सागर अंभोरे यानी मानले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1