सामाजिक
पाहुणी गावच्या मुख्य मार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन
आठ दिवसाचा अल्टीमेट: मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलणाचा ईशारा…
राजू आगलावे (जि.प्र)
भंडारा:- पाहुणी गावच्या मुख्य मार्गाची दुरावस्था झाल्याने, मार्गावरुन ये-जा करतांना ग्रामवासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याने, मार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करुन संबंधित विभागाला निवेदन देण्यात आलीत. परंतु सदर मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने, अखेर सोमवारी गावाच्या मुख्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी, भंडारा-रामटेक सर्हीस रोडवरिल पाहुणी बसस्थानक येथे ग्रामवासीयांनी एकत्र येत मागणीच्या पुर्ततेसाठी सकाळी रास्तारोको आंदोलन केले.
भंडारा-रामटेक मार्गावरील, भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर पाहूणी गाव असुन,४-५ वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. हा मुख्य रस्ता असल्याने भोसा- टाकळी, खमारी, नेरी आदी गावांना जोडणारा मार्ग आहे. सर्व्हीस मार्गावर असलेल्या पाहूणी बसस्थानक ते पाहूणी गावापर्यंतच्या मार्गाची दुर्देशा झाल्याने, मागील दोन वर्षापासुन सदर मार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन करुन संबंधित विभागाला निवेदन देत पाठपुरावा केला.त्यावर विभागाकडून आश्वासने देण्यात आली. परंतु, समस्या आजही जैसे थे अशीच असल्याने, शेवटी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा पाहुणी ग्राम पंचायतचे सरपंच रंजित सेलोकर यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी सोमवारी भंडारा- रामटेक सर्व्हीस मार्गावरिल पाहुणी बसस्थानकासमोर सकाळी एकत्र येवून असलेली मागणी त्वरित पुर्ण करण्यासाठी रास्तारोको आंदोलन करुन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच मोहाडी तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राजेश हटवार सहभागी झाले होते. दरम्यान वाहतूक प्रभावि झाली होती. सदर आंदोलनाची दखल घेत, वरठी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पाटील हे ताफ्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,आंदोलनकर्ते यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला स्थळी बोलावून त्यांनी तसे ठरलेल्या दिवसात मार्गाचे काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, असा हट्ट पकडला असता, पोलिस निरिक्षक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करुन माहीती दिल्यानंतर ते स्थळी पोहचले व चर्चा करुन समस्या सोडवीण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेतले. आठ दिवसात पाहुणी गावाच्या मार्गाची दुरुस्ती न केल्यास, पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामवासीयांनी प्रशासनाला ईशारा दिला हे विशेष.