जय श्रीराम च्या जयघोषाने दुमदुमली धामणगाव नगरी
धामणगाव रेल्वे :- लाखो भाविकांना उत्सुकता असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव आज गुरुवारी मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून दरवर्षीप्रमाणे श्री राम जन्मोत्सव समितीच्या आयोजनातू भव्यदिव्य शोभायात्रा शहरात काढली जाणार आहे.
चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव दरवर्षी शहरात साजरा केला जातो.आज दिनांक ३० मार्च रोजी शहरतातील विविध श्री राम मंदिरात रोषणाईचा झगमगाट व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान दुपारी ४ वाजता श्री राम जन्मोत्सव समितीने भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या शोभयात्रेत श्री रामचंद्र प्रभूच्या आकर्षक जिवंत देखावे,पंजाबी ढोल,ताशे,लेझीम पथक,दिंडी पताका,बेंजो पथक व भजनी मंडळ सामील होणार आहे.उजैन येथील झांज डमरू पथक या शोभयात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.सदरची शोभायात्रा जुना दत्तापुर परिसरातील कॉटन मार्केट चौक,अमर शहीद भगतसिंग चौक ते रेल्वे फाटक होत महात्मा गांधी चौक,नूतन चौक,सिनेमा चौक ते टिळक चौक येथील हनुमान मंदिर परिसरात सदरच्या शोभयात्रेचे समाप्ती होणार आहे.श्री राम जन्मोत्सव शोभयात्रे शहरातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घ्यावा असे आवाहन श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.